ताज्या घडामोडी

चांदवड शहरात सलग तिसऱ्या दिवशी लस उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांचा हिरमोड*

*चांदवड शहरात सलग तिसऱ्या दिवशी लस उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांचा हिरमोड*

चांदवड तालुका प्रतिनिधी: सुनिलआण्णा सोनवणे

चांदवड शहरात दि 29/6/2021 व 30/6 /2021 या दोन दिवस कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध झालेली नसल्याने अनेक लाभार्थी उपजिल्हा रुग्णालयात चक्कर मारून परत गेले.आज पुन्हा चांदवडचे तालुका आरोग्य अधिकारी श्री पंकज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्या दि 1/7/2021 रोजी कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने लसीकरण होणार नसल्याचे कळविल्याने इच्छुक लाभार्थ्यांचा चांगलाच हिरमोड झालेला आहे.
लसीकरण साठी आता सामान्य नागरिकांमधून संपूर्ण तालुक्यातुन उस्फुर्त पणे नागरीक घराबाहेर पडत आहेत.
मुळातच चांदवड तालुक्यात 18 ते 44 चे लसीकरण उशिरा सुरू झाल्याने गर्दी होत होती ,आता सलग 3 दिवस लस उपलब्ध नसल्याने लस उपलब्ध होताच गर्दी उसळली नाही म्हणजे बरे!!!

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close