ताज्या घडामोडी

अभिमानास्पद :- सावद्याची तरुणी नेहा नारखेडे यांनी केले अमरिकन शेअर बाजारात कमाल…!*

*अभिमानास्पद :- सावद्याची तरुणी नेहा नारखेडे यांनी केले अमरिकन शेअर बाजारात कमाल…!*

कुठलीही पार्श्वभूमी नसताना तरुणी स्वकर्तुत्वाने अब्जाधीश होण्याच्या वाटेवर

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या बनाना सिटी म्हणून दिल्लीपर्यंत प्रसिद्ध असलेल्या सावदा गावातील बुधवार भागात रहिवाशी व (सेवानिवृत्त पोस्टमास्टर) अर्जुन कृष्णा नारखेडे यांची नात नेहा नारखेडे ही पुण्यात वाढलेली असून त्याचे शिक्षण सुद्धा पुण्यात झालेले असून त्यांनी स्वकर्तृत्वाने स्वतः एक कंपनी स्थापन करून अमेरिकन शेअर बाजारात मोठी कमाल करून दाखवली आहे

अधिक माहिती अशी की अमेरिकन शेअर बाजारात IPO आल्यानंतर पहिल्याच दिवशी जोरदार मुसंडी मारणाऱ्या Confluent कंपनीची जोरदार चर्चा आहे. पण आपल्यासाठी याहून मोठी बातमी अशी की. या कंपनीची सहसंस्थापक व सावदा येथील रहिवासी नेहा नारखेडे -ही पुण्यात वाढलेली एक मराठी तरुणी. स्वकर्तृत्वावर मोठी झालेल्या टेक्नोक्रॅट किंवा तंत्रज्ञान उद्योजिकेची प्रेरणादायी कथा आशिकी

न्यूयॉर्क, २८ जून: कॅलिफोर्नियातली कॉन्फ्लुएंट (Confluent IPO) ही कंपनी अमेरिकेतल्या नॅस्डॅक (Nasdaq) या शेअर बाजारात गुरुवारी २४ जून लिस्ट झाली. ३६ डॉलर्स प्रति शेअर या मूल्यासह दाखल झालेल्या आयपीओद्वारे (IPO) ८२८ दशलक्ष डॉलर उभे केले गेले. त्यामुळे कंपनीचे मूल्यांकन ९.१ अब्ज डॉलर एवढं झालं. शेअर बाजाराच्या पहिल्याच दिवसाच्या शेवटी कॉन्फ्लुएंटच्या शेअर्सच्या मूल्यामध्ये जवळपास २५% वाढ झाली आणि ते मूल्य ४५.०२ डॉलर प्रति शेअर एवढं झालं. अमेरिकन शेअर बाजारात पहिल्याच दिवशी IPO आल्यानंतर हा एवढा भाव मिळवल्याने Confluent कंपनीची जोरदार चर्चा आहे. पण आपल्यासाठी याहून मोठी बातमी आहे. या कंपनीची सहसंस्थापक आहे नेहा नारखेडे – पुण्यात वाढलेली एक मराठी तरुणी. कुठलीही  पार्श्वभूमी नसताना अमेरिकेत शिकायला जाऊन तिथे स्वकर्तृत्वावर मोठी झालेल्या टेक्नोक्रॅट किंवा तंत्रज्ञान उद्योजिकेची प्रेरणादायी यशाची खरी बातमी आहे.

ADVERTISEMENT

त्यामुळे कंपनीचं भांडवली बाजारमूल्य ११.४ अब्ज डॉलर एवढं झालं. या घटनेचं महत्त्व काय, हे सांगणारी गोष्ट पुढेच आहे. या घटनेमुळे या कंपनीच्या तीन संस्थापकांपैकी दोन संस्थापक अब्जाधीश झाले आणि तिसरी संस्थापक अब्जाधीश होण्याच्या वाटेवर आहे. ती तिसरी संस्थापक एक मराठी मुलगी आहे, ही सावध आवासीय सह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी अभिमानास्पद बाब आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close