ताज्या घडामोडी

वनहद्दीतील लेंडीखताची विल्हेवाट लावणाऱ्या अधिकाऱ्यांनची पंधरा दिवसात चौकशीचे:-वनविभागाचे आश्वासन…

वनहद्दीतील लेंडीखताची विल्हेवाट लावणाऱ्या अधिकाऱ्यांनची पंधरा दिवसात चौकशीचे:-वनविभागाचे आश्वासन…

येवला
ममदापुर वनहद्धीतील लेंडीखत परस्पर विक्री करणाऱ्या वनसंवरक्षक, वनरक्षक अधिकारी यांची चौकशी होण्यासाठी मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारी सोमवार दिनांक 28 रोजी वनहद्दीतच उपोषणाला बसले होते. परंतु वनपरीक्षेत्र अधिकारी येवला यांनी उपोषणाला भेट दिली.व दोषी अधिकाऱ्यानवर कारवाईचे आश्वासन दिले. शेख यांच्या लेखी आश्वासंणानंतर मराठा मावळा संघटनेने उपोषण थांबविले.ममदापुर वनहद्दीतील लेंडीखत परस्पर विक्री करणाऱ्या दोषी अधिकारी व कर्मचारी यांची येत्या पंधरा दिवसात चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन वनपरीक्षेत्र अधिकारी बी.आर शेख यांनी मराठा मावळा संघटनेला दिले. उपोषणास बसलेले देविदास गुडघे गुडघे यांनी दोषी अधिकाऱ्यांवर पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास संघटना पुढचे पाऊल उचलेल असे गुडघे यांनी सांगितले.यावेळी उपस्थित मराठा मावळा संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष देविदास गुडघे पाटील,उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रदीप दवंगे, नासिक जिल्हा शहर अध्यक्ष स्वप्नील चव्हाण,नासिक जिल्हा शहर कार्यअध्यक्ष राकेश वाडिले,रिंकेश मोरे, ज्ञानेश्वर भगत, अमित शर्मा आदीसह पदाधिकारी उपस्थित होते


कोट:-
लेंडीखताची विल्हेवाट लावणाऱ्या दोषी अधिकारी यांची येत्या पंधरा दिवसात चौकशी होऊन योग्य ती कार्यवाही न झाल्यास आमची संघटना पुढचं टोकाचं पाऊल उचलणार आहे..

देविदास गुडघे पाटील
मराठा मावळा संघटना नासिक जिल्हा अध्यक्ष,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close