ताज्या घडामोडी

ठाकरे परिवाराला शिवीगाळ करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी – खालापूर तालुका शिवसेना युवासेनेची मागणी

ठाकरे परिवाराला शिवीगाळ करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी – खालापूर तालुका शिवसेना युवासेनेची मागणी

खालापूर – समाधान दिसले

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याला लोकनेते दि.बा.पाटील नाव देण्याच्या संदर्भात काढण्यात आलेल्या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख व कुटुंबियांना झालेल्या शिवीगाळ प्रकरणात त्वरित कारवाई करावी असे निवेदन खालापूर शिवसेना – युवासेना यांच्या वतीने खालापूर पोलीस ठाण्यात देण्यात आले.

दि.२४ जून रोजी सीबीडी नवीमुंबई येथे नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या परिवाराला शिवीगाळ करण्यात आली. या प्रकारामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून संबंधितांवर कारवाई करावी यासाठी खालापूर तालुका शिवसेना – युवासेना यांच्या वतीने खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खालापूर तालुका शिवसेना समन्वयक एकनाथ पिंगळे, युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, तालुका अधिकारी महेश पाटील, महिला आघाडी संघटीका रेश्मा आंग्रे, सुप्रिया साळुंखे, प्रसिध्दीप्रमुख भाऊ सणस, विभागप्रमुख हुसेनभाई खान, विलास चाळके, राहूल आंग्रे आदीप्रमुख उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close