ताज्या घडामोडी

स्वच्छ सुंदर माझे गाव’ बोरगाव गावातील तरुणांचा अनोखा उपक्रम

‘स्वच्छ सुंदर माझे गाव’ बोरगाव गावातील तरुणांचा अनोखा उपक्रम

नेरळ : दिपक बोराडे
राष्ट्रसंत स्वच्छतादूत संत गाडगे महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वच्छ सुंदर माझे गाव या संकल्पनेतून कर्जत तालुक्यातील कळंब जवळलील बोरगाव गावातील नवतरुणांनी गावातील रस्ते, नाले ,गटारे, साफ करून स्वच्छते चा संदेश नागरिकांना दिला.
कर्जत तालुक्यातील बोरगाव गावामध्ये मंगळवारी गावातील सर्व नवतरुणांनी एकत्र येऊन गावातील रस्ते व नाले यांची साफसफाई करण्यात आली. पावसाळी गावातील घनकचरा हा पाण्याच्या प्रवाहाने रस्त्यावर व नाल्यामध्ये अडकला जातो त्यामुळे नाले तुंबले जातात तसेच मातीचा थर येऊन रस्त्यावर साचला जातो. परिणामी त्या रस्त्यावरून चालायला अडचण निर्माण होते तसेच वाहन चालवताना त्रास सहन करावा लागतो याची दखल गावातील नवतरुणांनी घेऊन गावातील रस्त्यावरचा मातीचा थर हा बाजूला करून सर्व रस्ता व नालेसफाई केली. तसेच गावातील तरुण समीर खडेकर यांनी स्वखर्चाने ट्रॅक्टर च्या साहाय्याने सर्व माती व घनकचरा गावाच्या बाहेर टाकण्यात आला. अशा पद्धतीने रस्ते व नाले साफ करून गावातील प्रमुख रस्ता पूर्व परिस्थिती मध्ये आणला.या कार्यामुळे सर्व स्वछता दूतांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close