ताज्या घडामोडी

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा चांदवड यांचे वतीने प्रांताधिकारी साहेब चांदवड यांना मागण्यांचे निवेदन

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा चांदवड यांचे वतीने प्रांताधिकारी साहेब चांदवड यांना मागण्यांचे निवेदन
चांदवड :सुनीलआण्णा सोनवणे
सध्या देशात कोरोना आजाराने सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवन जगणे मुश्कील झाले आहे शेतकरी शेतमजूर असंघटित कामगार यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. लोकांना रोजगार गेलेला आहे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे.
सर्वसामान्य लोकांना वस्तू खरेदी करणे अशक्यप्राय झालेले आहे अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे अशा संकटातील परिस्थितीत समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना न्याय मिळणे गरजेचे आहे केंद्र व राज्य सरकारने घोषणा न करता त्याची त्वरित प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे त्यांनी दिलेल्या मागण्या खालीलप्रमाणे
पेट्रोल डिझेल व गॅस चे दर कमी करा.
कोरोना  साथीच्या काळात औषधांच्या किमती कमी करा. 
शेतकरी विरोधी तीन  कायदे रद्द करा. शेतमालाला हमी भाव देणारा कायदा मंजूर करा संसदेत प्रस्तावित विधेयक मागे घ्या.
कोरोना काळात ज्यांनी काम केले त्यांना प्रोत्साहन भत्ता द्या व 50 लाख विमा केंद्र व राज्य सरकार यांनी द्या.
रेल्वे ओईल कंपन्या खाली बँक इत्यादीचे खाजगीकरण रद्द करा.
शेतकऱ्यांना त्वरित बँकेमार्फत कर्ज पुरवठा करा.
वरील मागण्यांची सरकारने त्वरित दखल घ्यावी अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभा तीव्र आंदोलन छेडेल याची ऊशासनाने नोंद घ्यावी आंदोलनात जिल्हा सेक्रेटरी अॅड.दत्तात्रय गांगुर्डे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष भास्करराव शिंदे ,सुखदेव केदारे ,किरण गावकर, रंगनाथ जिरे, नंदकिशोर देशमाने, नवनाथ जिरे, दशरथ कोतवाल व इत्यादी कार्यकर्ते निवेदन देतांना हजर होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close