ताज्या घडामोडी

घेरडी रक्तदान शिबिर ,वृक्षारोपण व वृक्ष वाटप जीवनावश्यक वस्तू चे किट (किराणा ) वाटप कार्यक्रम संपन्न

घेरडी रक्तदान शिबिर ,वृक्षारोपण व वृक्ष वाटप जीवनावश्यक वस्तू चे किट (किराणा ) वाटप कार्यक्रम संपन्न
_________________________

सांगोला/विकास गंगणे-

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त रक्तनदान शिबिर चे उद्घाटन सांगोला शिवसेना शहर प्रमुख कामरुद्दीन खतीब यांच्या हस्ते संपन्न झाला तसेच वीरशैव लिंगायत समाज मंदिर व महादेव मंदिर परिसर ,महादेव मंदिर खडपे वस्ती येथे सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी (बापू ) पाटील , सांगोला शिवसेना तालुका प्रमुख सुर्यकांत घाडगे ,युवा सेना प्रमुख स्वप्नील वाघमारे, cbs news मराठी संपादक चाँद भैया शेख , एकमत प्रतिनिधी विकास गंगणे यांच्या शुभ हस्ते वृक्षलागवड व वृक्ष लागवड करण्यात आली .
या कार्यक्रम प्रसंगी सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील बोलत असताना 50 वर्षा मध्ये जे शक्य झाले नाही ते या 5 वर्षात करून दाखवण्याचा आपला मानस असल्याचे मत व्यक्त केले . विविध योजनांसाठी मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्या साठी दोनशे कोटी निधी मंजूर केला असून अजून साडे सहाशे कोटी मंजुरी साठी प्रस्ताव केला आहे असे मत व्यक्त केले
तसेच या शिवसेना वर्धापन श्रीनिवास करे यांच्या माध्यमातून वृक्ष , व जीवनावश्यक वस्तूचे किट( किराणा ) देण्यात आले .
या कार्यक्रमासाठी सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सुर्यकांत घाडगे ,युवा सेना जिल्हा प्रमुख स्वप्नील वाघमारे, माजी सरपंच घेरडी दिलीप मोटे , माजी सरपंच कयुम आतार, ग्रामपंचायत सदस्य भाऊ यमगर सर, ग्रामपंचायत सदस्य फारुख आतार, ग्रामपंचायत सदस्य अविनाश जगधने, सांगोला नगरसेवक यावलकर , राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा अध्यक्ष व घेरडी ग्रामपंचायत सदस्य सोमा (आबा) मोटे , युवासेना सांगोला समनव्यक शंकर मेटकरी ,युवा सेना तालुखा प्रमुख भोसले ,उपतालुका प्रमुख काशीद ,उपतालुक प्रमुख आलदार , हे उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत कोळी यांनी केले या कार्यक्रमसाठीतुकाराम औताडे सर, आपा सरगर ,महेश कारंडे ,प्रभुलिंग स्वामी , बंदेनवाज खलिफा शिवसेना युवा शाखा प्रमुख घेरडी योगेश खुळपे, ,अनिकेत पोतदार, बापू गुजले, अनिकेत पोळ , हरिदास घटूकडे गजानन अंकलगी, नामदेव सुरवसे प्रकाश दिवसे व घेरडी शिवसैनिक यांनी परिश्रम घेतले व रेवनील ब्लड बँक सांगोला यांनी रकदान शिबीर साठी सहकार्य केले .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close