ताज्या घडामोडी

झोपलेल्या नगरपरिषदेला स्मरणपत्रानंतर जाग येईल का

झोपलेल्या नगरपरिषदेला स्मरणपत्रानंतर जाग येईल का?

चांदवड-सुनील अण्णा सोनवणे

चांदवड नगरपरिषदेला मागील महिन्यात भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व काही सामाजिक कार्यकर्ते यांनी शहरातील विविध समस्यांबाबत निवेदन दिले होते.मात्र यात काहीच कार्यवाही न झाल्याने आज पुन्हा स्मरणपत्र देण्याची वेळ नागरिकांवर आली.शहरातील खालील समस्या तातडीने सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यात प्रामुख्याने घंटागाडी दररोज येणे अपेक्षित आहे.पाणीपुरवठा 3 ते 4 दिवसाआड होणे आवश्यक आहे.गटारींची साफसफाई होणे आवश्यक आहे.रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या बाभळी तोडणे गरजेचे आहे.मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, शहरात जंतुनाशक फवारणी करावी अश्या विविध समस्या मांडलेल्या आहेत.यावेळी महेंद्र कर्डिले , अंकुर कासलीवाल, मुकेश आहेर, संजय चोबे , किशोर क्षत्रिय, महेश बोऱ्हाडे ,प्रशांत दळवी, संकेत वानखेडे, वैभव जाधव आदी उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close