ताज्या घडामोडी

कोलीवली गावातील महिला बचत गटांना कचराकुंड्यांची भेट

कोलीवली गावातील महिला बचत गटांना कचराकुंड्यांची भेट

नेरळ : दिपक बोराडे

नेरळ-कशेळे रस्त्यावर असलेल्या कोलीवली गावातील महिला बचत गटाचे काम पाहून मुंबई अंधेरी येथील दानशूर संस्थेने कचरा गोळा करून ठेवण्यासाठी कचरा कुंड्यांची भेट दिली आहे.
सटूआई या जागृत देवीचे मंदिर असून मोठ्या प्रमाणात भाविक देवीची ओटी भरण्यासाठी येत असतात.त्यामुळे गावातील आणि मंदिरासमोरचे रस्ते स्वच्छ असावेत यासाठी कोलीवली गावातील महिला बचत गटाच्या महिला त्या रस्त्यांची साफसफाई दैनंदिन करीत असतात. काही दिवसांपूर्वी मंदिरात दर्शनासाठी मुंबई अंधेरी येथून भाविक आले होते.भाविक म्हणून आलेले जयेश चौधरी यांनी महिला बचत गटाचे कार्य पाहून आनंद व्यक्त केला.त्यानंतर रविवार 27 जून रोजी मुंबई येथून पुन्हा कोलीवली येथे येत महिला बचत गटासाठी कचरा कुंड्या आणि झाडू भेट दिले.सुमारे 20 चांगल्या दर्जाच्या कचरा कुंड्या जयेश चौधरी यांनी कै. आनंद चौधरी यांच्या स्मरणार्थ भेट दिली आहे.स्वच्छ आणि सुंदर कोलीवली गाव ठेवावे यासाठी कचरा कुंड्या आणि झाडू यांची भेट जयेश चौधरी यांनी स्थानिक रहिवाशी भास्कर भिवा मिसाळ,हरेश जानु सोनावळे,नवनाथ गणू ठोंबरे यांच्या माध्यमातून देण्यात आली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close