ताज्या घडामोडी

विश्वजीत फाउंडेशनच्या मार्फत तासगाव तालुक्यातील आशासेविका यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम*

*विश्वजीत फाउंडेशनच्या मार्फत तासगाव तालुक्यातील आशासेविका यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम*

सर्वत्र कोरोनाचे आव्हान असताना आता मान्सूनही दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर “आरोग्यदूत” म्हणून आशा सेविका प्रत्येक गावात फिरुन लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून आशा सेविका आपली भूमिका पार पाडत आहेत. या परिस्थितीत आशा सेविकांना छत्रीरूपाने आधार मिळावा. याकरिता आ.मोहनराव कदम दादा व डॉ.शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ना.डॉ.विश्वजीत कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातील सर्व आशा सेविकांना छत्री वाटपाची मोहीम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज विश्वजितेश फौंडेशनच्या माध्यमातून तासगाव तालुक्यातील आशा सेविकांना छत्री वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तासगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.महादेव पाटील, मा.धनाजी कदम, मा.रवींद्र साळुंखे, मा.राजीव मोरे, मा.बाबुराव माळी, मा.महेश पाटील, मा.शरद शेळके, मा.रोहित साळुंखे, मा.गणेश जाधव, मा.अजित मुळीक, मा.महावीर भोरे, मा.महेश जगताप, मा.विनायक रुपनर, मा.स्वप्नील गायकवाड, मा.निलेश माने यांच्यासह विश्वजितेश फौंडेशनचे पदाधिकारी, आशा माता-भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*प्रतिनिधी सागर जमदाडे मणेराजुरी*
*सांगली जिल्हा प्रमुख विजय तिकोटी सर*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close