ताज्या घडामोडी

येवले तालुक्यातील ममदापुर राखीव वनहद्दीतील लेंडीखत परस्पर विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? चौकशीच्या मागणीसाठी मराठा मावळा संघटनेचे वनक्षेत्रातच उपोषण..

येवला प्रतिनिधी… बातमी…

येवले तालुक्यातील ममदापुर राखीव वनहद्दीतील लेंडीखत परस्पर विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का?

चौकशीच्या मागणीसाठी मराठा मावळा संघटनेचे वनक्षेत्रातच उपोषण..‾
ममदापुर वनपरीक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अर्थकारणाचं पाणी मुरत असल्याची चर्चा होत असतांनाच वन कर्मचाऱ्यांनी वनहद्दीतील लाखो रुपयांचा लेंडीखत परस्पर विक्रीचा महाप्रताप करुन एक

प्रकारे शासनाला आव्हानच दिलेय.सर्व नियम धाब्यावर बसून शासनाची फसवणूक करणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्या ऐवजी वन विभागाचे अधिकारी दबाव तंत्राचा वापर करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करताय. याप्रकरणात अधिकाऱ्यांचे देखील खिसे गरम झाले की काय ? असा संशय सामान्य जनतेतून व्यक्त होतोय. या प्रकरणी मराठा मावळा संघटनेने ग्रामपंचायत व वनविभागाकडे तक्रार करून चौकशी व दोषीवर कारवाईची मागणी केलीय. चौकशी करण्या ऐवजी अधिकारीच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करताय असा आरोप करीत मराठा मावळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास गुडघे यांनी वनहद्दीतच उपोषणाला सुरुवात केलीय.

उपोषणाला पाठींबा दर्शवण्यासाठी प्रदिप दवंगे, रिंकेश मोरे,ज्ञानेश्वर भगत, स्वप्नील चव्हाण, राकेश वाडीले, अमीत शर्मा आदी मराठा मावळा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close