ताज्या घडामोडी

वीकेंड लॉकडाउनचे पालन न करणाऱ्या आस्थापनावर दंडात्मक कारवाई

वीकेंड लॉकडाउनचे पालन न करणाऱ्या आस्थापनावर दंडात्मक कारवाई
चांदवड : सुनिलआण्णा सोनवणे

ब्रेकिंग द चेन (break the chain) नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कठोर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी नाशिक श्री. सुरज मांढरे यांच्या सूचनेनुसार चांदवड शहरात चांदवड नगरपरिषद व प्रशासनातर्फे वेळोवेळी कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. ह्या अंतर्गत कोरोना विषाणूचा प्रसार कमी करण्याच्या उद्देशाने शनिवार व रविवार हे दोन दिवस वीकेंड लॉकडाउन घोषित करण्यात आलेले आहेत. नागरीकांच्या सहकार्याने व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वीकेंड लॉकडाउन यशस्वी करण्यात प्रशासनास यश येत आहे परंतु वारंवार सूचना देऊनही काही व्यावसायिकांद्वारे वीकेंड लॉकडाउनचे उल्लंघन होतांना आढळत होते. त्यानुसार दि. २६ व २७ जून ह्या रोजी वीकेंड लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना मुख्याधिकारी श्री. अभिजीत कदम व पोलीस निरीक्षक श्री. समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाद्वारे प्रत्येकी रुपये ५०००/- असा एकूण तीस हजार रुपये इतका दंड करण्यात आला शिवाय विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर एकूण तीन हजार पाचशे इतका दंड करण्यात आला.
चांदवड उपविभागाचे प्रांत अधिकारी श्री. चंद्रशेखर देशमुख यांचंतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की नागरिकांच्या सहकार्याने कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे शक्य आहे; कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याने सर्वांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close