ताज्या घडामोडी

ओबीसी असोसिएशन मनमाड वर्कशॉप रेल्वे यांच्यातर्फे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

ओबीसी असोसिएशन मनमाड वर्कशॉप रेल्वे यांच्यातर्फे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

प्रतिनिधी.आफरोज अत्तार.

ओबीसी असोशियन सेंट्रल रेल्वेचे झोनल सचिव श्री अहवेशकमार,अध्यक्ष श्री अनिलकुमार,कार्यध्यक्ष लोहारसाहेब यांच्या बहुमोल मार्गदर्शनाने आज ओबीसी कारखाना शाखा
मनमाड च्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला..
या प्रसंगी अतिरिक्त डिव्हीजन सचिव श्री रतन निकम यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शाहू महाराजांच्या विविध गुण कार्यविशेषाचा परीचय करून दिला ,तर शाखा सचिव श्री शशिकांत अढोकार उत्कृष्ट सुत्र संचालन केले तसेच कार्याध्यक्ष संजय कातकडे व
खजिनदार रामधनी यादव यांनी छान आयोजन केले.
या प्रसंगी निवृत्त फौजी सरनामसिंग तोमर यांनी दिपप्रज्वलन केले तर एस्सी/एसटी असोशियनचे झोनल सचिव श्री सतिशभाऊ केदारे यांनी महारांजाच्या तैलचित्रास पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच सी आर एम एसचे महेंद्र चौथमल यांनी
महाराजांच्या जीवनावर विचार व्यक्त केले .तर सागर साळवे,प्रविण दोंड,
यांची भाषणे झाली.मनसे शाखा अध्यक्ष श्री भास्करभाऊ सोमासे व गौतम गांगुर्डे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.तर ए डब्लू एम पापाचंद साहेब एस एस ई समन्वय सोनवणे साहेब, एस एस ई बंद्रे साहेब यांनी अभिवादन केले.कोविडच्या सुरक्षा पालन करत कामगार बंधू भगिनींनी मोठ्या उत्साहात जय़ती साजरी केली.
सगळ्यांचे ओबीसी कारखाना शाखेने आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close