ताज्या घडामोडी

राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्ट कडून छत्र्या व रेनकोट चे वाटप

राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्ट कडून छत्र्या व रेनकोट चे वाटप
नेरळ : दिपक बोराडे
कर्जत तालुक्यात आदिवासी भागात मागील चार वर्षांपासून सामजिक उपक्रम राबवत असलेली राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्ट वंजारपाडा नेरळ यांनी आदिवासी वस्तीवर तसेच कोरोना काळात फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणार्यांना रेनकोट तसेच छत्र्यांचे वाटप केले ,
राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष भरत जगमोहन मेहरा हे मागील चार पाच वर्षांपासून आपल्या ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक सामजिक उपक्रम राबवित आहेत ,नेरळ जवळील वंजार पाडा येथील ट्रस्ट च्या मुख्यालयात सर्व सामन्यासाठी मोफत औषधे, रुग्णवाहिका , प्याथॉलॉजी लॅब,टंचाईग्रस्त भागात टँकर द्वारे पाणी पुरवठा करणे या सारखे अनेक उपक्रम राबवत आले आहेत,संकट काळात गरिबांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप असो वा तिन्ही ऋतूत सर्वसामान्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवणे अश्या प्रकारे अखंडित पणे त्यांचे कार्य सुरू आहे ,
यंदाच्या पावसाळ्यात शुक्रवारी दिनांक 25 रोजी ट्रस्ट च्या कार्यकर्त्यांनी वारे परिसरातील करकुल वाडी ,विकास वाडी ,जांभूळवाडी येथील आदिवासी बांधवांना त्यांच्या वाड्या वस्तीवर जाऊन त्यांना रेनकोट,छत्र्यांचे वाटप करण्यात आले,यावेळी संस्थेचे कार्यक्रते ऍड महेश आगे व त्यांचे सहकारी उपस्तीत होते ,विशेष म्हणजे कोरोनाचा काळात आपल्या जीवाची पर्वा नकरता फ्रंट लाईन वर्कर म्हणून आपली जबाबदारी चोखपणे बजवणाऱ्या कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदकीय अधिकारी व कर्मचारी,आशा वर्कर ,कळंब पोलीस स्टेशनचे अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांना तसेच वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनाही यावेळी सुमारे 400 रेनकोट,व 600 छत्र्यांचे वाटप करण्यात आले,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close