ताज्या घडामोडी

भाजपा चिपळूणची शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी : स्वराज्य संस्था मधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी

भाजपा चिपळूणची शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी : स्वराज्य संस्था मधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी. तसेच मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती मध्ये आरक्षण लागू करण्यात यावे. ओबीसींची जनगणना करण्यात यावी या तीन मागण्याबाबत भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर ,चिपळूण तालुका भाजप अध्यक्ष विनोद भोबस्कर, शहराध्यक्ष आशिष खातू यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या शिष्टमंडळाने शासनासाठी निवासी नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे, नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, नगरसेविका नुपूर बाचीम, रसिका देवळेकर ,भाजपा जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संतोष मालक, तालुकाध्यक्ष दिनेश बावकर ,विनोद कदम ,जगदीश वाघुळदे, मारुती होडे ,नगरसेवक परिमल भोसले ,रत्नदीप देवळेकर, सोमनाथ सुरवसे ,महेश दिक्षित ,दीपक मोरे ,संदेश भालेकर ,अमोल रावण आदी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी: श्री चंद्रकांत खोपडकर.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close