ताज्या घडामोडी

अनाथांचा नाथ… साहेब ! मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

– All right are © reserved –

अनाथांचा नाथ… साहेब !
मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

– जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करून,त्या प्रश्नाच्या गाभ्या पर्यंत जावून त्यावर सकारात्मक मार्ग काढून त्या प्रश्नांना न्याय देण्याची ठाम भूमिका असलेले लोकनेते भुजबळ साहेब यांचा पुन्हा एकदा अन्न पुरवठा विभागा अंतर्गत अनाथांना BPL शिधा पत्रिका लाभ देण्याचा मोठा निर्णय.

– राज्यातील अनाथांना मिळणार BPL शिधापत्रिका; राज्यातील अनाथांना स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी अशी मागणी अनेक वर्ष केली जात होती ती मागणी लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण झाली, या बाबत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांनी बैठका घेत अनाथांना वयाच्या २८ वर्षा पर्यंत तात्पुरती पिवळी (BPL) शिधापत्रिका वितरण करण्याबाबतचा निर्णय प्राधान्य कुटुंब योजनें अंतर्गत घेतला आहे.

– राज्यातील २८ वर्षा पर्यंतच्या अनाथांना BPL शिधा पत्रिके बरोबर त्याचे लाभ मिळतील व २८ वर्षा वरील अनाथांना उत्पन्ना प्रमाणे शिधापत्रिका मिळेल व त्याप्रमाणे त्याचे लाभ देण्यात येतील; या निर्णया मुळे राज्यातील अनाथ मुलांना मोठा आधार होणार आहे.

– निराधार अनाथ जनतेचे साहेब,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण ह्या खाते अंतर्गत तारणहार झाले; अन्न पुरवठा खात्याचा आज वरचा सर्वोत्तम निर्णय साहेब यांनी घेतला; या अगोदर मोफत शिवभोजन थाळी,कोवीड काळात मोफत रेशन धान्य वाटप ह्या माध्यमातून गरीब जनतेला साहेबांच्या माध्यमातून मोठी मदत मिळाली, राज्यभरातील जनतेने ह्या सुविधांचा लाभ घेतला.

– कोरोना काळात अनेक मुलांच्या पालकांचे मृत्यू झाल्या मुळे ते अनाथ झाले आहेत; अश्या मुलांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याने ह्या निर्णया च्या माध्यमातून साहेबांनी पुरवठा खात्यात एक आदर्श उभा केला आहे.

– राज्य सरकारने हा निर्णय घेतल्या नंतर शिधापत्रिका मिळवताना कागदपत्रांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अनाथ असल्याचा पुरावा म्हणून महिला व बालविकास विभागाने वितरित केलेले अनाथ प्रमाणपत्र किंवा आई व वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह धरण्यात येणार असल्याचे माहिती देखील मंत्री भुजबळ साहेब यांनी दिली; अनाथांना दुर्लक्षीत करून चालणार नाही त्यांना सामाजिक,शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी कटीबद्ध असल्याची भावना देखील साहेब यांनी व्यक्त केली.

– दीन दुबळ्या,शोषित,वंचित समाजाचे आपण काही तरी देणे लागतो; ह्या उद्देशाने साहेब यांनी पुरवठा खाते अंतर्गत अन्न पुरवठा विभागाचा पदभार स्वीकारला आणि त्या नंतर ह्या खात्यात अमुलाग्र बदल झाले, हे बदल लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मुळे शक्य झाले याचा अभिमान वाटतो.

✍️✍️
कमलेश पैठणकर

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close