ताज्या घडामोडी

श्री साई ट्रस्टने दोन गावात पोहचविले पिण्याचे पाणी.

श्री साई ट्रस्टने दोन गावात पोहचविले पिण्याचे पाणी..
नेरळ: दिपक बोराडे
कर्जत तालुक्यातील चिमटेवाडी आणि कर्जत तालुक्याचे सरहद्दीवर असलेल्या सिद्धगड या दोन ठिकाणी पिण्याचे पाणी पोहचत नव्हते.नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल दोन किलोमीटर अंतरावरून जलवाहिनीच्या साहाय्याने पाणी आणून पाण्याची सोय केली आहे.
गेली 10 वर्षे नेरळ आणि नंतर कर्जत तालुक्यात नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्ट ही संस्था शिक्षण, आरोग्य,पाणी तसेच आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्याचे काम करते.या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील चिमटेवाडी मध्ये पिण्याचे पाणी नव्हते.त्याचवेळी त्याच मार्गावर असलेल्या आणि कर्जत तालुक्याचे सरहद्दीवर असलेल्या ऐतिहासिक सिद्धगड या गावात देखील पिण्याच्या पाण्याची स्थिती दयनीय होती.तेथील ग्रामस्थांच्या मागणीनंतर श्री साई ट्रस्टने चिमटेवाडी आणि सिध्दगड नवीन वसाहत या दोन्ही ठिकाणी दोन किलोमीटर अंतरावरुन पिण्याचे पाणी आणले.त्यानंतर या दोन्ही ठिकाणी पाच हजार लिटर क्षमतेची टाकी बसविण्यात आली.त्या टाकीतून पाणी स्थानिकांच्या घरापर्यंत पोहचवले गेले आहे.आदिवासी भागातील पाण्याची होणारी गैरसोय श्री साई ट्रस्ट नवी मुंबई यांनी यापूर्वी चिंचवाडी, बांगरवाडी गावातील पाणी पुरवठा करणारी योजना पूर्ण केली आहे.
याप्रसंगी श्री साई ट्रस्टच्या डॉ.निर्मला राव यांचे हस्ते नळपाणी योजना उद्घाटन झाले,तर श्रीधरन राव,रोहित कुमार, गणेश अय्यर,ट्रस्टचे स्थानिक कार्यकर्ते दिलीप घुले,प्रदीप सैंदाणे,आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close