ताज्या घडामोडी

चांदवड नगरपरिषदेला आली जाग,बातमीनंतर चेंबरचे काम मार्गी व कुंडी स्वच्छ—पोलीस टाईम्स बातमीचा……दणका….कामच सुरु

पोलीस टाईम्स बातमीचा......दणका....कामच सुरु

 चांदवड नगरपरिषदेला आली जाग,बातमीनंतर चेंबरचे काम मार्गी व कुंडी स्वच्छ

चांदवड तालुका प्रतिनिधी-सुनील अण्णा सोनवणे

चांदवड नगरपरिषद स्वछता विभाग काही दिवसांपासून सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आहे.चांदवड शहरातील तळवाडे रोड भागात फुलेनगर वस्तीतील ड्रेनेज चेंबर रस्त्याचे काम सुरू असताना फुटलेले होते याबाबत काही शिवसैनिक व परिसरातील नागरिकांनी मुख्यधिकारी श्री अभिजित कदम यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.काल मुख्याधिकारी कदम साहेब, स्वच्छता अभियंता श्री सत्यवान गायकवाड साहेब यांनी तातडीने जे सी बी त्या ठिकाणी पाठवून काम मार्गी लावून दिले,त्याबद्दल प्रसाद प्रजापत,मनोज जाधव व नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले.
तसेच महालक्ष्मी नगर भागातील कचराकुंडी स्वच्छ नसल्याबाबत सोशल मीडियातून अनेक तक्रारी येत होत्या त्याची दखल घेऊन कुंड्या स्वछ करून आणखी एक नवीन कुंडीची व्यवस्था महालक्ष्मी नगर भागात स्वच्छता विभागाने उपलब्ध केली त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पोलीस टाईम्स बातमीचा……दणका….कामच सुरु

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close