ताज्या घडामोडी

चांदवड नगरपरिषद कचरा संकलन नवीन ठेका मंजुरी तात्काळ मिळावी- भूषण कासलीवाल यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

चांदवड नगरपरिषद कचरा संकलन नवीन ठेका मंजुरी तात्काळ मिळावी-
भूषण कासलीवाल यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
चांदवड : सुनिल आण्णा सोनवणे
चांदवड चे प्रथम नगराध्यक्ष श्री भूषण कासलीवाल यांनी आज जिल्हाधिकारी साहेब यांना घन कचरा संकलन व कचरा विलगी करण ठेका ची मुदत सुमारे एकवीस दिवसांपासून संपलेली आहे. तरी या ठेक्यास तत्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी केली आहे.
चांदवड शहरात गटारी तुडुंब भरून तुंबल्या मुळे शहरात डेंगू मलेरिया वर डासांचे प्रमाण वाढत असून शहरात आजार व दुर्गंधी होऊन अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात त्यामुळे नवीन ठेका काढण्यास नगरपरिषद ला परवानगी द्यावि अशी विनंती भूषण कासलीवाल यांनी केली आहे.तसेच श्री भूषण कासलीवाल यांनी निवेदनात नमूद केले आहे की सोशल मीडियावर तक्रारी वाढत आहेत यामुळे प्रशासनास देखील वेठीस धरले जात आहे तरी आपल्या परीने सहकार्य करून तात्काळ ठेक्यास परवानगी देण्याची विनंती कासलीवाल यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close