ताज्या घडामोडी

वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा ; # पोलीस कर्मचार्यांचा अनोखा उपक्रम # कळंब पोलीस चौकी परिसरात 100 वृक्षांची लागवड

वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा ;
# पोलीस कर्मचार्यांचा अनोखा उपक्रम
# कळंब पोलीस चौकी परिसरात 100 वृक्षांची लागवड

नेरळ : दिपक बोराडे

पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हासाने निसर्ग चक्र बदलत चालले आहे ,त्याचे दुष्परिणाम पुढील पिढीस भोगावे लागू नये या साठी मोठया प्रमाणात आत्ताच वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे ही बाब ध्यानात घेऊन कळंब पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक केतन सांगळे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वृक्षारोपण करण्याचा निश्चित केले व कळंब पोलीस चौकी परिसरात पोलीस कर्मचाऱ्या कडून वृक्षारोपण करण्यात आले,
केतन सांगळे यांनी आपला वाढदिवस एक सामाजिक उपक्रम राबवून करण्याचे ठरवले त्यानुसार आज 23 जून रोजी असणाऱ्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्तीत वाढदिवस साजरा केला यावेळी कळंब चौकीत केक कापून त्यांना भरविण्यात आला तसेच कळंब पोलीस चौकीच्या सुमारे 2 एकर च्या परिसरात विविध प्रकारच्या शेकडो रोपांची लागवड करण्यात आली,
एक आदर्शवत काम हाती घेऊन पोलीस स्टेशन परिसरात हिरवाई निर्माण व्हावी त्यासाठी सहकारी पोलीस कर्मचार्यांना प्रेरित करून आपल्या वाढदिवशी वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला व बुधवार 23 जून ला कळंब पोलीस चौकी परिसरात नारळ, आंबा,पेरू ,चिकू , जांभूळ ,बदाम,अश्या विविध प्रकारची फळ झाडे व औषधी वनस्पती ची रोपांची लागवड केली व लावलेल्या प्रत्येक रोपांची संवर्धन करण्याची जबाबदारी पोलीस स्टेशन च्या कर्मचार्यांनी घेऊन पोलीस स्टेशन चा परिसर गर्द हिरवाईने नटवण्याची ग्वाही यावेळी दिली ,यावेळी पोलीस हवालदार भरत गर्जे, योगेश गिरी निरंजन दवणे, होमगार्ड मनीष खुणे ,यांसह आदिवासी संघटनेचे मनोहर पादिर, माजी सरपंच फाईक खान उपस्तीत होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close