ताज्या घडामोडी

देवपूर अमरधाम आणि चितोड रोड अमरधाम येथे दोन विदयुत शवदाहिनी केंद्र उभारणेकरिता १.५ कोटी रुपये निधी मंजूर..!*

प्रतिनिधि मोहसिन शाह

*देवपूर अमरधाम आणि चितोड रोड अमरधाम येथे दोन विदयुत शवदाहिनी केंद्र उभारणेकरिता १.५ कोटी रुपये निधी मंजूर..!*

*आमदारांच्या कामांची जिल्हाभर चर्चा..! शहरात सर्वसमावेशक असे काम सुरु असल्याने सर्व सामान्य धुळेकर नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण..!*

 

(धुळे दि. २३ जून २०२१) धुळे जिल्हयात व शहरात मागील काही महिन्यांपूर्वीची कोरोनाची परिस्थिती पाहता रुग्णांच्या मृत्यूचा दर चिंताजनक होता. अश्या वेळी कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीस अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीस अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकड उपलब्ध होत नव्हते, त्यातून कोरोना किंवा इतर आजारांचा संसर्ग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. धुळे शहरात अश्यावेळी कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीस अंत्यसंस्कार करण्यासाठी फक्त श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळेच्या मागेच फक्त जागा उपलब्ध होती. महानगरपालिकेतील कर्मचारी संख्या कमी असल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत होते आणि त्यात रात्री अपरात्री मृतदेह अनंतात विलीन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झालेल्या होत्या. अशा अनेक तक्रारी व वेगवेगळ्या व्यथा आमदार फारूक शाह यांच्या कार्यालयात भेटून संबंधित नागरिकांनी मांडल्या.

याच पार्श्वभूमीवर आमदार फारूक शाह यांनी त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून देवपूर अमरधाम आणि चितोड रोड अमरधाम येथे दोन विदयुत शवदाहिनी केंद्र उभारणेकरिता ३० लक्ष रुपये मंजूर केले होते. परंतु सदरचा निधी अपुरा पडत असल्याने मागील काही दिवसांपासून आमदार फारूक शाह हे दोन्ही शवदाहिनी केंद्र उभारणेकरिता सातत्याने प्रयत्नशील होते. मुंबई मंत्रालय येथे जातांना आवर्जून शवदाहिनी केंद्र उभारणेकरिताचे पत्र नगरविकास मंत्री नामदार श्री. एकनाथ शिंदे साहेब यांना दिलेले होते. आज त्या प्रयत्नाला यश आले असून आमदार फारूक शाह यांच्या मागणीला नगर विकास मंत्र्यानी मान्यता देत देवपूर अमरधाम आणि चितोड रोड अमरधाम येथे दोन विदयुत शवदाहिनी केंद्र उभारणेकरिता १.५ कोटी रुपये निधी मंजूर केला. यावेळी धुळे शहराच्या जनतेसह आमदार फारूक शाह यांनी नगरविकास मंत्री नामदार श्री. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. शहरात सर्वसमावेशक असे काम सुरु असल्याने सर्व सामान्य धुळेकर नागरीकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आमदारांच्या कामांची चर्चा होऊ लागल्या आहेत.

कृपया प्रसिद्धीसाठी दि. २३-०६-२०२१

आपला

निलेश काटे
जनसंपर्क अधिकारी तथा स्वीय सहाय्यक
आमदार, धुळे शहर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close