ताज्या घडामोडी

साळुंखे पाटील म्हणजे रक्तातच जनसेवा*

साळुंखे पाटील म्हणजे रक्तातच जनसेवा*

सांगोला/विकास गंगणे-

आधी स्वर्गीय आमदार काकासाहेब, नंतर मा. आम. दिपकआबा आणि आता तिसऱ्या पिढीत चि. यशराजे ज्या पद्धतीने सामान्य लोकात मिसळतात, त्यांना आपलंसं करतात, ते पाहता साळुंखे पाटील कुटुंबियांचा जन्मच जणू जनसेवेसाठी झाला आहे याची प्रचिती येते.
नुकतेच हंगिरगे ता. सांगोला येथील एक लग्न समारंभ उरकून जवळ्याच्या दिशेने निघालेल्या चि.यशराजे साळुंखे पाटील यांना आपल्या आजोबासोबत म्हणजे स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या समवेत काम केलेले 80 वर्षीय आजोबा भेटले. त्यांच्याशी अगदी अदबीने आणि आदराने गप्पा मारून त्यांना आपल्या गाडीत बसवून अगदी सुरुवातीपासूनच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
एकंदरीतच हा प्रसंग जरी छोटासा असला तरी यामधून साळुंखे पाटील कुटुंबीयांची सामान्य नागरिकांशी असलेली नाळ किती घट्ट आहे. आणि साळुंखे पाटलांची तिसरी पिढीही राजकारणात त्याच ताकतीने सक्रिय असून स्वर्गीय आमदार काकासाहेबांचा वारसा समर्थपणे पुढे घेवून जात असल्याचे अधोरेखित होते.*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close