ताज्या घडामोडीराजकीय

चिल्हार नदी पात्रातील अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी उपोषणाचे हत्यार … सरपंच, उप सरपंचासह ग्रामस्थ करणार उपोषण

चिल्हार नदी पात्रातील अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी
उपोषणाचे हत्यार …
सरपंच, उप सरपंचासह ग्रामस्थ करणार उपोषण

राजपे ग्रामपंचायत सरपंच दिपाली पिंगळे

नेरळ : दिपक बोराडे
कर्जत तालुक्यातील रजपे ग्रामपंचायत हद्दीतील चिल्हार नदी पात्रातील अनधिकृत बांधकामा विरोधात रजपे ग्रामपंचायत आता अधिकच आक्रमक झाली असून प्रशासनाने बांधकाम न हटवल्यास सरपंचासह सर्व सदस्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

उप सरपंच संतोष निलध्ये

 

टेंभरे येथे चिल्हार नदी पात्रात अनाधिकृतपने दगडाचे कुंपण केल्याच्या विरोधात रजपे ग्रामपंचायत आता अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. वेळोवेळी तक्रारी करूनहि प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या सरपंच तसेच सर्व सदस्यांनी उपोषणाचा इशारा दिलाय.

ग्रामस्त

कर्जत तालुक्यातील टेंबरे येथे नदी पात्रामध्ये मुंबईतील एका फार्महाउसधारकाच अनाधिकृतपने दगडाचे कुंपण घातले आहे. या दगडी कुंपणामुळे नदी पात्र अरुंद झाले असून नदी लगत असलेल्या आदिवासी बांधवांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. या बांधकामास रजपे ग्रामपंचायतिने तीव्र विरोध करूनही या भूधारकाने या विरोधास केराची टोपली दाखवत बांधकाम सुरूच ठेवले होते. ग्रामपंचायत तसेच स्थानिकांनी वेळोवेळी या विरोधात तहसील तसेच पाटबंधारे विभागाकडे तक्रारी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत,

४ जून रोजी कर्जतचे तहसिलदार विक्रम देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती यावेळी सदरचे बांधकाम करण्यासाठी कोणतीही रीतसर परवानगी संबंधित विभागाकडून घेतली नसल्याने हे काम त्वरित काम बंद करण्याचे आदेश तहसिलदारांनी दिले. परंतु या भूधारकाने काम युद्धपातळीवर सुरूच ठेवले आहे,
दरम्यान या बांधकामा विरोधात रजपे ग्रामपंचायत आता अधिकच आक्रमक झाली असून प्रशासनाने त्वरित हे बांधकाम काढून टाकावे अन्यथा येणाऱ्या २९ जून रोजी कर्जत येथे टिळक चौकात उपोषणाला बसणार असल्याच्या इशारा सरपंच दिपाली पिंगळे यांनी दिला आहे,

चौकट :-
कागदी घोडे नाचवत ,प्रशासनाची टोलवाटोलवी
सदरील काम हे नदीच्या पात्रात असून पुररेषेच्या आत असल्याने भविष्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊन जीवित व इतर हानी होऊ शकते त्यामुळे सदरचे बांधकाम काढून टाकणे आवश्यक आहे.
असे लेखी पत्रात पाटबंधारे विभाग कर्जत यांनी म्हटले आहे, परंतु ते अधिकार महसूल विभाग तहसील कार्यालय व ग्रामपंचायत यांना असल्याचे सांगत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता टोलवाटोलवी करत आहेत,तर कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख हे हा प्रश्न पाटबंधारे विभागाचा असल्याचे म्हणत त्यांच्यावर ढकलत असल्याने पावसाळ्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होऊन जीवितहानी झाल्यास हेच अधिकारी जबाबदार असणार का ? असा प्रश्न आदिवासी बांधव करत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close