ताज्या घडामोडी

धुळे शहरात होणार भूमिगत विद्युत वाहिन्या आमदार फारूक शाह यांचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना साकडे..! निवेदनावर उर्जा मंत्री नितीन राऊत यांचा होकार..!*

*धुळे शहरात होणार भूमिगत विद्युत वाहिन्या आमदार फारूक शाह यांचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना साकडे..! निवेदनावर उर्जा मंत्री नितीन राऊत यांचा होकार..!*

*धुळे शहरातील नागरिकांना दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा देणे तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आमदार शाह यांचा मानस यशस्वी..!*

(धुळे दि. २२ जून २०२१) धुळे शहर मतदार संघातील ग्राहकांना दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा देणे तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी व त्याच अनुषंगाने विदयुत वितरण कंपनीची हानी कमी करण्यासाठी धुळे शहरातील उपरी तारमार्ग वाहिन्या भूमिगत करण्यात याव्यात. अशी कामे नाशिक, गोंदिया, मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये झालेली आहेत. याच पार्श्वभूमीवर धुळे शहरात वीज वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम होण्यासाठी नवीन उच्चदाब केंद्र स्थापित करणे, नवीन वितरण रोहित्र बसविणे, वितरण रोहीत्रांची क्षमता वाढविण्यासाठी संचालक (प्रकल्प) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांना धुळे शहरातील चार भाग करून टप्प्या टप्प्याने मंजूर करून प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश करावे आणि याकरिता आवश्यक निधीची तरतूद करावी.

वरील आशयाचे निवेदन आज धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेत सादर केले. यावर स्तुत्य उपक्रमावर यशस्वी चर्चा होऊन लवकरच मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आमदार शाह यांना दिले आहे. वरील काम पूर्णत्वास आल्यास धुळे शहरातील नागरिकांना दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा मिळेल आणि वीज वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास देखील मदत होणार आहे.

कृपया प्रसिद्धीसाठी दि. २२-०६-२०२१

आपला

फारूक अन्वर शाह
आमदार, धुळे शहर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close