ताज्या घडामोडी

कर्जत मुरबाड राष्ट्रीय मार्गावरील मार्केवाडी ते कडाव, कशेळे मार्गाची दुरावस्था, अर्धवट कामाचा नागरिकांना त्रास

कर्जत मुरबाड राष्ट्रीय मार्गावरील मार्केवाडी ते कडाव, कशेळे मार्गाची दुरावस्था,
अर्धवट कामाचा नागरिकांना त्रास

नेरळ : दिपक बोराडे
कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाकडून मागील चार वर्षांपासून हाती घेतले आहे ,खेदाचीबाब म्हणजे 18 महिने मुदतीच्या कामाला तब्बल 4 वर्षा पेक्षा अधिक काळ लोटला तरीही रस्त्याचे काम अपूर्णच आहे, ठेकेदाराकडून ठीक ठिकाणी अर्धवट ठेवलेल्या कामामुळे वाहतूकदार ,प्रवाश्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे ,
शासनाने करोडो रुपये खर्च करून राज्यातील व देशातील अनेक रस्त्यांचे नुतनीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे जेणेकरून दळणवळणाची सोय होऊन उद्योग व्यापारास चालना मिळुन देशाचा व राज्याचा आर्थिक विकास दर वाढण्यास मदत होईल. परंतु, शासन रस्ते विकासावर करोडो रुपये खर्च करत असताना स्थानिक पातळीवरील बांधकाम खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे त्या सर्वच रस्त्यांची अक्षरशः वाताहात झाली आहे. केवळ रस्त्यांची बिल काढुन संबंधित अधिकारी व ठेकेदार नामानिराळे राहिलेले दिसुन येत आहे. सुमारे तीन ते चार वर्षांपासून कर्जत मुरबाड राष्ट्रीय मार्गावरील कर्जत ते कशेळे ह्या रस्त्याचे काम कासव गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी अर्धवट कामे तशीच सोडुन दिलेली आहे तर अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्डेमय पॅच भरायचे बाकी आहेत. तर, अनेक ठिकाणी मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या आसपासच्या गावातील अंतर्गत रस्ते जोडणाऱ्या ठिकाणी अर्ध्या बाजुचे काम केले आहे तर अर्ध्या बाजुचा रस्ता अर्धवट खोदुन ठेवला आहे. त्यामुळे अनेकदा खोदुन ठेवलेल्या रस्त्याच्या ठिकाणी वाहनधारकांचे अपघात देखील झालेले आहेत. कडाव गावच्या अलिकडुन भिवपुरी टाटा रोडला जोडणारा रस्ता मागील दोन महिन्यांपासून अर्धवट खोदुन ठेवला आहे तसेच मार्केवाडी कडाव दरम्यान सिमेंट काॅंक्रटिचा रस्ता जोडला न गेल्यामुळे भले मोठे खड्डे रस्त्यावर पडले आहेत. अशीच स्तिथी वारे ते कशेले दरम्यान आहे त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करुन वाहने चालवावी लागत आहेत.‌ त्याचबरोबर कडाव ते टाकवे गावादरम्यान बनविलेल्या डांबरी रस्त्यावर शेवटचा डांबरी थर न टाकल्यामुळे पावसामुळे रस्त्यावरील डांबर निघुन गेल्याने रस्त्यावर छोटे मोठे खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व ठेकेदाराच्या हलगर्जी व दुर्लक्षामुळे जनतेचे कोट्यवधी रुपये अक्षरशः पाण्यात जात आहेत. याकडे महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कर्जत मुरबाड राष्ट्रीय मार्गावरील अर्धवट रस्त्याची तातडीने योग्य ती दुरुस्ती करुन नागरिकांना होणारा मनस्ताप दुर करण्याची मागणी होत आहे .

प्रतिक्रिया –
कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गचे काम मागील 4 वर्षा पासून सुरू असून ठेकेदाराकडून काही ठिकाण अर्धवट काम ठेवल्याने प्रवाश्यांना तारे वरची कसरत करून वाहन चालवावे लागत आहे,ठीक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यात पडून अपघात ही होत आहे या कडे संबंधीत्त अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने नागरिकांना मनस्ताप होत आहे,

प्रभाकर गंगावणे (सामाजीक कार्यकर्ते)

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close