ताज्या घडामोडी

रावजी शिंगवा यांच्या निधनाने नेरळमध्ये राजकीय समीकरणे बदलणार….. शिवसेनेची सत्ता जाण्याची शक्यता

रावजी शिंगवा यांच्या निधनाने नेरळमध्ये राजकीय समीकरणे बदलणार…..
शिवसेनेची सत्ता जाण्याची शक्यता

नेरळ : दिपक बोराडे
नेरळ ग्रामपंचायत या आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या ग्रामपंचायत मध्ये नजीकच्या काळात राजकीय समीकरणे बदलणार अशी चिन्हे आहेत.थेट सरपंच म्हणून निवडून आलेले रावजी गोमा शिंगवा यांचे आकस्मिक निधन झाल्याने आता नेरळ ग्रामपंचायतचे सरपंचपद हे सदस्यांतून निवडले जाणार आहे. दरम्यान,नेरळ ग्रामपंचायत मधील शिवसेनेची सत्ता राजकीय समीकरणे पाहता सेनेच्या हातातून जाण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट 2019 मध्ये नेरळ ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक झाली होती आणि त्यावेळी थेट सरपंच म्हणून शिवसेना-भाजप युतीकडून रावजी शिंगवा हे विजयी झाले होते. अनुसूचित जमाती साठी राखीव असलेल्या सरपंच पदावर थेट जनतेतून शिंगवा तर सेना-भाजप युतीने 12 जागा जिंकत बाजी मारली होती.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन,शेतकरी कामगार पक्षाचे एक तर शेकाप बंडखोर एक असे विरोधी गटाचे पाच जण विजयी झाले होते.मात्र उपसरपंच पदाच्या निवडणुकीचे भारतीय जनता पक्षाला उपसरपंच पद देण्यात आले नसल्याने भाजपने ऐनवेळी सेनेची साथ सोडून विरोधी गटासोबत हातमिळवणी केली.त्यामुळे शेकापचे बंडखोर म्हणून निवडून आलेले शंकर घोडविंदे हे उपसरपंच बनले.त्यानंतर दरवेळी बिग बजेटच्या नेरळ ग्रामपंचायतमध्ये राजकीय घडामोडी घडत असतात आणि प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलमधून निवडून आलेल्या पार्वती पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.तर सेनेने उपसरपंच पदावर निवडणूक लढविण्याची संधी दिलेल्या धर्मानंद गायकवाड यांना सेनेच्या नेरळ ग्रामपंचायत मधील सत्तेत कोणत्याही निर्णयात सहभागी करून घेत नसल्याने त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत आरपीआय आठवले गटात प्रवेश करून पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख हे पद मिळवले.ते धर्मानंद गायकवाड आता विरोधी पक्षात असून विरोधी पक्षाची ताकद वाढली होती.त्यावेळी शेकापच्या पॅनल मधून निवडून गेलेले नितीन निरगूडा यांनी सत्ताधारी सेनेला साथ देण्याचा निर्णय घेतला असून नेरळ ग्रामपंचायत मध्ये प्रभाग सहा मधून निवडून गेलेल्या शिवाली रासम-पोतदार यांना देखील सत्ताधारी शिवसेना जवळ करीत नाही.त्यामुळे शिवसेनेच्या सात सदस्यांपैकी गायकवाड, रासम- पोतदार हे दोन सदस्य हे आता सेनेच्या जवळ नाहीत तर पार्वती पवार आणि नितीन निरगुडा हे दोघे सेनेच्या जवळ आहेत.
त्यामुळे नेरळ ग्रामपंचायत मध्ये प्रभारी सरपंच शंकर घोडविंदे यांची बाजू भक्कम आहे.त्यांच्यासोबत पूर्वी विरोधी गटात असलेले सदस्य नेरळ ग्रामपंचायत मध्ये सत्ताधारी बनले होते.मात्र त्यात आता थेट सरपंच म्हणून निवडून आलेले आणि आजारपणामुळे रजेवर गेलेले रावजी शिंगवा यांचे निधन झाल्याने सेनेची सत्ता आताच नेरळ ग्रामपंचायत मधून गेलेली आहे. आताच्या परिस्थिती सेनेकडे हक्काचे सात सदस्य असून नजीकच्या काळात नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवडणूक होईल आणि त्यावेळी शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी दोन सदस्यांची गरज भासणार आहे.तर पूर्वीचे विरोधी पक्ष आणि आता सत्ताधारी बनलेले भारतीय जनता पार्टी,शेकाप,राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या पॅनल मधून निवडून आलेले आणि आता सत्ताधारी प्रभारी सरपंच यांचे बरोबर असलेले धर्मानंद गायकवाड,शिवाली रासम-पोतदार यांच्यामुळे सत्ताधारी गटाचे संख्याबळ 11 झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष चिन्हे नसल्याने पक्षांतर बंदीचा कायदा ग्रामपंचायत सदस्यांना लागू होत नाही.त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतचे सरपंच पद हे मिळविण्यासाठी शिवसेना आणि सध्याच्या सत्ताधारी गटात जोरदार राजकीय खेळी अपेक्षित आहेत.त्यात मानिवली ग्रामपंचायतचा राजकीय अनुभव तेथील स्थानिक राजकीय पक्षांना आहे,त्यामुळे नेरळ मध्ये देखील अशी राजकीय खेळी होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र राज्यातील राजकारण लक्षात घेता महाविकास आघाडीचा प्रयोग होऊ शकतो,पण या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षाचे सूर काही चांगले जुळत नाहीत.त्याचवेळी शिवसेना आणि भाजप यांचे जमण्याची देखील शक्यता नाही,कारण युती म्हणून 12 जागांवर विजय मिळविल्यानंतर देखील सेनेकडे थेट सरपंचपद आलेले असताना सेनेने भाजपला उपसरपंच पद दिले नाही.या सर्व घडामोडी प्रामुख्याने शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची शक्यता असून शिवसेनेला रावजी शिंगवा यांच्या निधनाने ग्रामपंचायतच्या सत्तेवरून प्रभारी सरपंच पदानंतर नव्याने होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे.

अनुसूचित जमातीचे तीन सदस्य…
नेरळ ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच हे अनुसूचित जमाती राखीव होते आणि नेरळ ग्रामपंचायत मधील 17 सदस्यांमध्ये तीन सदस्य हे अनुसूचित जमाती आहेत.त्यात उषा पारधी या शेकापच्या सदस्या आहेत,तर पार्वती पवार आणि नितीन निरगुडा हे सेनेच्या जवळ आहेत.त्यामुळे आगामी काळात नेरळचा सरपंच कोण असणार?याकडे नेरळकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close