ताज्या घडामोडी

आमदार स्थानिक विकास निधीतून २१ लाखांच्या काँक्रीट गटार व काँक्रीट रस्ते कामाचा लुकमान नगर, विटा भट्टी येथे आमदार फारूक शाह यांच्या हस्ते शुभारंभ…!*

*आमदार स्थानिक विकास निधीतून २१ लाखांच्या काँक्रीट गटार व काँक्रीट रस्ते कामाचा लुकमान नगर, विटा भट्टी येथे आमदार फारूक शाह यांच्या हस्ते शुभारंभ…!*

(धुळे दि. २१-०६-२०२१) धुळे शहरातील लुकमान नगर, विटा भट्टी येथे अनेक वर्षांपासून पावसाचे पाणी तुंबत होते या ठिकाणी चिखलात पडून अनेक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते आणि हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. तेथे नविन काँक्रीट गटार आणि काँक्रीट रस्ते व्हावे अशी परीसरातील रहिवाश्यांची आणि तेथून वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होती. याठिकाणी गटार आणि रस्ते नसल्याने नागरिकांची पावसाळ्यात तारांबळ होत होती. येणा-जाणाऱ्या नागरिकांना त्या रोड वरून जातांना लहान मोठे खड्डे व जमेलेले पाणी यातून वाहने घेऊन जाणे या सारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. या ठिकाणच्या नागरिकांनी आमदार फारूक शाह यांना तक्रार निवेदन सादर केले होते. यावरून आमदार फारूक शाह यांनी स्वत: तेथे भेट देत पाहणी करत नागरिकांना आश्वासन दिले होते कि आपल्याकडे लवकरात लवकर गटारीचे आणि रस्त्याचे काम सुरु करणार. त्याच शब्दाला जागून आज आमदार फारूक शाह यांनी त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून लुकमान नगर, विटा भट्टी येथे ६ लाखाच्या काँक्रीट गटारी आणि १५ लाखाच्या काँक्रीट रस्त्यांचे उद्घाटन केले. या ठिकाणी एकूण ४० लाखांच्या कामांचे धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

या कामाच्या उद्घाटना प्रसंगी धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्यासह धुळे मनपाचे नगरसेवक युसुफ मुल्ला, सईद बेग, नासीर पठाण, गनी डॉलर, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक, धुळे महिला शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, शहराध्यक्ष नुरा ठेकेदार, अफसर शाह, रईस शाह, ईबा ठेकेदार, कैसर अहमद, चिराग खाटिक, आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नजहर पठाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर आभार शहजाद मन्सुरी यांनी मानले.

प्रसिद्धीसाठी दि. २१-०६-२०२१

शाह फारूक अन्वर
आमदार, धुळे शहर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close