ताज्या घडामोडी

भारतीय जनता पार्टीच्या आमदार मनीषा ताई चौधरी यांच्या उपस्थितीत शिरसाड येथे महत्वाची बैठक पार पडली..

भारतीय जनता पार्टीच्या आमदार मनीषा ताई चौधरी यांच्या उपस्थितीत शिरसाड येथे महत्वाची बैठक पार पडली..

सुहास पांचाळ

शिरसाड : 21 जून : ओबीसींच्या राजकीय आरक्षण विषयासंदर्भात 26 जून रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे तरी भारतीय जनता पार्टी मधील सर्व सन्माननीय ओबीसी नेते आंदोलनाच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र दौरा करत असून आज दहिसर च्या कार्यसम्राट आमदार आणी वसई विरार शहर जिल्ह्याच्या प्रभारी श्रीमती मनीषा ताई चौधरी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आज सोमवार दिनांक 21.06.2021 रोजी वसई विरार शहर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी व ओबीसी मोर्चाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.

26 जूनला पक्षातर्फे करीत असलेल्या चक्काजाम आंदोलनाबद्दल, त्यानंतर कायदेशीर मार्गाने, पुढे जाण्याच्या मार्गाबद्दल सविस्तर माहिती स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिली.

याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष श्री.राजनजी (आप्पा) नाईक, जिल्हा सरचिटणीस उत्तम कुमार, महेंद्र पाटील ,राजू म्हात्रे,ओबीसी प्रदेश पदाधिकारी श्री.केदारनाथ म्हात्रे,योगिता पाटील,संजोग यंदे भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.नरेश पाटील जिल्हा सरचिटणीस श्री. निलेश राणे, गणेश पाटील ओबीसी मोर्चा नालासोपारा अध्यक्ष श्री. सुहास पांचाळ व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close