ताज्या घडामोडी

लासगाव दि २१-* लासलगाव येथील कोटमगाव रोडवर असलेल्या जाधव गॅस एजन्सी जवळ सकाळी 10 वाजेच्या सुमारास दोन अनोळखी अज्ञात इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करून एका महिलेच्या हातातील व गळ्यातील अंदाजे ५ ते ६ तोळे सोने पिशवी ठेवण्याचे सांगून सदर पिशवी घेऊन पोबारा केला असल्याची घटना घडल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

*लासलगाव/राहुल वैराळ*
*लासगाव दि २१-* लासलगाव येथील कोटमगाव रोडवर असलेल्या जाधव गॅस एजन्सी जवळ सकाळी 10 वाजेच्या सुमारास दोन अनोळखी अज्ञात इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करून एका महिलेच्या हातातील व गळ्यातील अंदाजे ५ ते ६ तोळे सोने पिशवी ठेवण्याचे सांगून सदर पिशवी घेऊन पोबारा केला असल्याची घटना घडल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कोटमगाव रोड परिसरातील जाधव गॅस एजन्सी जवळ फिर्यादी सुलोचना विजय कोचर वय ६५ वर्षे राहणार श्रीराम नगर लासलगाव यांच्या जवळ दोन अनोळखी इसम आले हो तुम्ही एवढे दागिने घालून का फिरतात तुम्ही टीव्ही पाहत नाही का आम्ही पोलिस आहोत अशी बतावणी करून सुलोचना कोचर यांना त्यांच्या हातातील व गळ्यातील असलेले अंदाजे २ लाख १५ हजार किमतीचे ५ ते ६ तोळे सोने पिशवीत ठेवण्यास सांगितले व आम्ही या बाबत खात्री करतो असे फिर्यादीस सांगून सदर पिशवी घेऊन पोबारा केला.
याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात भादवि कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे ,सहा देविदास लाड, पोलीस नाईक कैलास महाजन वाडीलाल जाधव ,प्रदीप आजगे, गणेश बागुल हे करीत आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close