ताज्या घडामोडी

जत नगरपरिषद मध्ये नगरसेवकपदी गोतम ऐवळे यांना संधी द्या; लोकनियुत सरपंच राजाराम जावीर यांची मागणी

जत नगरपरिषद मध्ये नगरसेवकपदी गोतम ऐवळे यांना संधी द्या; लोकनियुत सरपंच राजाराम जावीर यांची मागणी

जत प्रतिनिधींनी ( कुभांरी ) मयुर मोरे
जत नगरपरिषद मध्ये स्विकृत नगरसेवक म्हणून माजी आमदार विलासराव जगताप साहेब यांनी होलार समाजाचे नेते गोतम भाऊ ऐवळे यांना संधी द्यावी. अशी मागणी होलार समाजाचे जत तालुका नेते व कुंभारीचे लोकनियुकत सरपंच राजाराम जावीर व सरपंच परिषद जत तालुका कार्याध्यक्ष यांनी ठामपणे सांगितले आहे. की जत मध्ये एकही होलार समाजाला नगरसेवक पदी संधी मिळाली नाही तरी माजी आमदार विलासराव जगताप साहेब यांनी होलार समाजाला नाय दयावा अशी विनंती केली आहे. संधी न मिळाल्यास होलारसमाजाला न्याय देणारा नेता जत तालुकामध्ये नाही असे समजून यापुढे तालुक्यात होलार समाज विचार करून निर्णय घेईल अशा कुंभारीचे सरपंच व जत तालुका सरपंच परिषद जत तालुका कार्याध्यक्ष राजाराम जावीर यांनी इशारा दिला आहे जावीर
म्हणाले की, गेली तेवीस वर्षे होलार समाज जगताप साहेब यांच्या पाठीशी कायम उभा राहिला. आहे साहेब तेथे होलार समाज अशी ताकद दाखवून दिली आहे. जिल्हा परिषद असो किंवा विधानसभा लोकसभा तळागाळातील होलार समाज बांधव एकनिष्ठ जगताप साहेब यांच्या पाठीशी कायम उभा राहिला आहे. तालुक्यात पंचवीस हजार मतदार संख्या आहे. तरीही जगताप साहेबांना आज अखेर आम्ही काहीही मागितले नाही गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही साहेबांच्या बैठकीत हीच मागणी केली होती. परंतु काही नेत्यांनी स्विकृत नगरसेवक पदाचा विचार करू असे सांगीतले होते. त्याचा विचार व्हावा या होलार समाजाला नाय दयावा अशी मागणी अखिल भारतीय होलार समाज संघटना ए गट महाराष्ट्र राज्य संस्थापक सदस्य राजाराम जावीर यांनी केले आहे

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close