ताज्या घडामोडी

माथेरान घाटरस्त्यातील धोकादायक दरडी बाबत युद्ध पातळीवर निर्णय घ्यावा

दरड कोसळण्याची घटना सुरूच

माथेरान घाटरस्त्यातील धोकादायक दरडी बाबत युद्ध पातळीवर निर्णय घ्यावा

दरड कोसळण्याची घटना सुरूच

चंद्रकांत सुतार–माथेरान

पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून माथेरानची ओळख निर्माण झाली आहे त्यामुळे इथे सातत्याने पर्यटकांचा मोठया प्रमाणावर वाढ पहावयास मिळतो. अवघड नागमोडी वळणाचा चढावाचा घाटरस्ता आणि याच मार्गावरील धबधब्याचा रमणीय देखावा मनाला अगदी ताजेतवाने करतो. पावसाने न्हाऊन निघालेल्या हिरव्यागार डोंगराच्या रांगा आणि त्यातच डोंगर द-यांवरून वाहणारे शुभ्र फेसाळ पाणी तर खूपच उंचीवरून पडणारे जलप्रपात मन अगदी प्रफुल्लित करतात.अनेकदा पर्यटक हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी इथल्या निसर्गाशी एकरूप होण्यासाठी खाजगी अथवा स्वतःच्या वाहनाने न चुकता पावसाळ्यात येत असतात.
परंतु ह्या घाट मार्गावर काही ठिकाणी खूपच धोकादायक दरडी केव्हाही कोसळण्याच्या मार्गावर दिसत आहेत.त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.स्थानिकांनी याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा निवेदने दिलेली आहेत. परंतु अद्याप काही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. दरवर्षी पावसाळ्यात या घाटरस्त्याच्या भागात दरडी कोसळत असतात. सुदैवाने आजवर कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ज्या ज्या ठिकाणी निसटत्या मोठं मोठया दरडी आहेत त्या वेळीच काढून टाकणे गरजेचे आहे अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी दस्तुरी येथील चांगभले मंदिराच्या पहिल्या वळणावर मोठी दरड कोसळली होती त्यामुळे वाहतूक व्यवस्था तात्पुरती बंद करण्यात आली होती त्यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागली होती.याच ठिकाणी दुसऱ्या वळणाच्या जागी सुध्दा भली मोठी धोकादायक दरड कोसळण्याच्या स्थितीत आहे.
अशा दरडीना संरक्षक जाळी सुध्दा तग धरू शकत नाही, आज ही वाटर पाईप स्टेशन वरील बाजूस कड्यावरचा गणपती जाण्याचा रेल्वे मार्गावर मोठाले दरड कोसळला आहे रेल्वे मार्ग होता म्हणून तो दगड व मलबा रेल्वेवरच अडकून राहिला ,तो खाली रस्त्यावर आला असता तर आजही नेरळ माथेरान घाट बंद झाला असता व काहीही विपरीत घडले असते, आज रविवार सुट्टीदिवशी या भागात अनेक पर्यटक कड्यावरचा गणपती पेब किल्या वर जातअसतात ,त्यातही नेरळ माथेरान गाडी ही बंद आहे सुदैवाने कोणतीही हानी झाली नसली तरी रेल्वे मार्ग बंद पडला आहे , त्यासाठी लवकरात लवकर या दरडी संबंधीत खात्याने काढून टाकाव्यात आणि जुम्मा पट्टी ते वॉटर पाईप स्टेशन या मुख्य भागातील धोकादायक दरडींना संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close