ताज्या घडामोडी

गोदापात्रातील ऐतिहासिक गोपिकाबाई पेशवे समाधीस्थळ जतन व्हावे.* *नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेवतीने मागणी.*

*गोदापात्रातील ऐतिहासिक गोपिकाबाई पेशवे समाधीस्थळ जतन व्हावे.*
*नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेवतीने मागणी.*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे मो.9421608985

नाशिक:- नाशिकच्या गोदावरी पात्रात होळकर पुलाच्या पूर्वेस असलेली गोपिकाबाई पेशवे यांची समाधी ऐतिहासिक वारसा आहे,तसेच गोदापात्र ही जशी अध्यात्मिक भूमी तशीच ही ऐतिहासिक घटना घडामोडीं तसेच त्या पाऊलखुणा असलेली भूमी आहे,या ठिकाणी अनेक पुरातन वास्तू,विविध समाध्या आहेत,त्यांना येथे गोदावरी पात्रात सुरू असलेले स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या कामकाजात उपद्रव होऊ नये,उलट हा ऐतिहासिक ठेवा जतन, संवर्धन व संरक्षित रहावा,या हेतूने नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने गोपिकाबाई पेशवे यांच्या तुळशी वृंदावन समाधी स्थळाची पाहणी,निरीक्षण व या ठिकाणी पुष्पहार व फुले वाहून उपस्थित दुर्गसंवर्धकांना (दि.२० जून ) माहिती देण्यात आली.
शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची १३४ वी “ऐतिहासिक पाऊलखुणा अभ्यास मोहीम”(रविवार दि २०जून)रोजी झाली.दुर्गसंवर्धनात अभ्यासात्मक श्रमदान,ऐतिहासिक ज्ञात अज्ञात ठिकाणी अभ्यास मोहिमा, व इतिहास जागृती या उद्देशाने झालेल्या १३४ व्या अभ्यास मोहिमेचे आयोजन केले होते,या निमित्ताने गोदा पात्रातील ऐतिहासिक पाऊलखुणा अभ्यास मोहीम आयोजित केली होती,यावेळी नाशिकला गोदावरी पात्रात होळकर पुलाखाली स्मार्ट सिटी अंतर्गत मँकीनीकल गेटच्या कामकाजात पायासाठी खोदकाम करण्यात आले आहे,या वेळी या ठिकाणी असलेली ऐतिहासिक नाशिकच्या माहेरवाशीण गोपिकाबाई पेशवे यांची समाधीला पिवळ्या खुणा करून उध्वस्त करण्याचा प्रकार पेशवे व रास्ते कुटुंबियांच्या वंशज व स्थानिक नागरिकांनी रोखला,व या ठिकाणी कुठलेही बदल करू नये,ते स्मृतिस्थल जतन करावे म्हणून स्मार्ट सिटीला पत्र देऊन या आधीच सांगितले आहे,त्याबरोबर आमदार बाळासाहेब सानप,गोदाप्रेमी देवांग जानी,देवेन्द्र पंड्या,कृष्णकुमार नेरकर,यांनी ही पाठपुरावा करून हे स्मृतिस्थळ जैसे थे ठेवून जतन करण्यासाठी प्रशासनाला कळवले आहे,
दरम्यान गोपिकाबाई नानासाहेब पेशवे यांच्या निधनानंतर नाशिकला आल्या त्यांनी रामकुंड व लक्षमण कुंडाला बांध घातला,२० ते २५ मंदिरे बांधली,अत्यंत कर्तृत्ववान,स्वाभिमानी असलेल्या विकसक म्हणून ओळख असलेल्या गोपिकाबाई पेशवे यांचे निधन ११ ऑगष्ट १७७८ ला नाशिकला झाले,त्यांचे भाऊ सरदार रास्ते यांनी त्यांचे अंत्यसंस्कार झाल्याच्या ठिकाणी गोपिकाबाईंचे तुळशी वृंदावन आकाराची स्मृतीसमाधी बांधली,आज तागायत पाण्यात असलेली ही समाधी गोदेच्या पात्रात पाणी नसल्याने दिसते,कित्येक पुरांचे आघात होऊनही ही समाधी शाबूत आहे,याबाबत शिवकार्यचा दुर्गभ्यासक मनोज अहिरे यांनी मोहिमेत सविस्तर इतिहास सांगितला,तर योगेश कापसे यांनी याबाबत आपल्या संस्थेवतीने नाशिक मनपाला गोदा पात्रातील इतिहास जपावा असे पत्र देऊ असे आवाहन केले,शेवटी सर्वांनी सरदार रास्ते वाड्याची बाहेरून पाहणी केली,
यावेळी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ,योगेश कापसे,श्रमदान टीमचे अमोल बच्छाव,भूषण औटे,इतिहास अभ्यासक दुर्गसंवर्धक मनोज अहिरे,दऱ्या देवी पर्यटन चे भारत पिंगळे,शिवाजी धोंडगे,एन डी ठाकरे,अविनाश क्षीरसागर हे यावेळी उपस्थित होते,
फोटोत:-
नाशिकच्या गोदापात्रातील गोपिकाबाई समाधीचे जतन व्हावे यासाठी तसेच गोदाघाटाचा इतिहासाच्या पाऊलखुणा जपाव्या त्यासाठी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने गोदा इतिहास अभ्यास मोहीम केली त्यात संस्थापक राम खुर्दळ,योगेश कापसे,भारत पिंगळे,शिवाजी धोंडगे,भूषण औटे,अमोल बच्छाव,मनोज अहिरे,अविनाश क्षीरसागर
आपला:-
राम खुर्दळ,संस्थापक शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था,नाशिक जिल्हा 9423055801

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close