ताज्या घडामोडी

पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर ”गुन्हेगार सुधार योजना 2021“ मेळाव्याचे आयोजन*

*पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर ”गुन्हेगार सुधार योजना 2021“ मेळाव्याचे आयोजन*

नाशिक प्रतिनिधी कपिल कट्यारे मो.9421608985


नाशिक – महाराष्ट्र पोलीस नियमावली नुसार गुन्हयांच्या प्रतिबंधाबरोबरच गुन्हेगारांमध्ये सुधारणा करणे हे देखील पोलीसांचे उदिद्ष्ट असावे या संकल्पनेतुन श्री. दीपक पाण्डेय् साो. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी पोलीस आयुक्तलयात ”गुन्हेगार सुधार योजना“ राबविण्याबाबत आज दिनांक 20/06/2021 रोजी आदेश निर्गमीत केले आहेत.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नाशिक शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ठोस प्रतिबंधक कारवाया केल्या जातात. सामाजिक स्वास्थ्य बिघडविणा-या गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. व मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली जाते. ज्या गुन्हेगार/आरोपीतांना संधी दिल्यास सुधारू शकतात अशा गुन्हेगार/आरोपीतांची माहिती घेवुन, अशा गुन्हेगार/आरोपीतांनी चांगल्या वर्तणुकीचा बंधपत्र लिहुन दिल्यास त्यांना सुधारण्यास वाव देवुन समाजातील जबाबदार नागरीक म्हणुन ताठ मानेने जीवन जगण्यासाठी संधी या ”गुन्हेगार सुधार योजने“ अंतर्गत देण्यात येणार आहे.∅
बरेच गुन्हेगार/आरोपीतांकडुन भावनेच्या भरात अनावधानाने व अजाणतेपणे त्यांचे साथीदार/मित्रांसमवेत गुन्हेगारी कृतीमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांच्या विरूध्द गुन्हे दाखल झालेले आहेत. काही गुन्हेगार/आरोपींना गुन्हेगारी मार्ग सोडुन भविष्यात समाजात सर्वसामान्य जीवन जगण्याची इच्छा असते परंतु मकोका कायदया अंतर्गत कारवाई करतांना मागील 10 वर्षाच्या गुन्हेगारीचा विचार केला जातो. त्यामुळे ज्या गुन्हेगार/आरोपींना समाजामध्ये चांगले जीवन जगण्याची इच्छा आहे अशा गुन्हेगार/आरोपींना संधी देण्यासाठी ”गुन्हेगार सुधार योजना“ मेळाव्याची सुरूवात उदया सोमवार दिनांक 21/06/2021 रोजी 16.00 वा. सहा.पोलीस आयुक्त, विभाग-1 ते 4 नाशिक शहर येथे राबविण्यात येणार असुन, मेळावा सुरूवातीला सलग तिन महिने(प्रत्येक महिन्याला 1 मेळावा) व त्यानंतर त्रिमासिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
गुन्हेगार सुधार योजना मेळावा दरम्यान मानसोपचार तज्ञ/समुपदेशक, वरिष्ठ पोलीस अधिकाररी हे उपस्थित गुन्हेगार/आरोेपी यांना समुपदेशन व मार्गदर्शन करणार असुन, त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत काय आहेत याबाबत माहिती घेवुन त्यांना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अधिकारी यांचे ही मार्गदर्शन मिळणार आहे
मा.श्री. दीपक पाण्डेय् साो. पोलीस आयुक्त, नाशिक यांचे अध्यक्षतेखाली गुन्हेगार सुधार योजना मेळावा चे पोलीस आयुक्तलयातील सर्व विभागात आयोजन करण्यात येणार असुन, मेळाव्या दरम्यान सर्व पोलीस उप आयुक्त, सर्व सहा.पोलीस आयुक्त व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हजर राहुन मार्गदर्शन करणार आहेत.
विभागाचे संबंधीत अधिकारी यांचे मोबाईल नंबर व फोन नंबर
1) श्री मधुकर गावीत, सपोआ. विभाग- 1 मो.नं. 8805422999 , फो.न. 0253-2505215
2) श्रीमती दिपाली खन्ना, सपोआ. विभाग- 2 मो.नं. 7219314433 फो.नं.0253-2315985
3) श्री सोहेल शेख, सपोआ. विभाग- 3 मो.नं.9822284250 फो.नं.0253-2505119
4) श्री समिर शेख, सपोआ.विभाग-4 मो.नं.8007070801 फो.नं.0253-2461233

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close