ताज्या घडामोडी

खालापूर पोलिसांनी पावसाळी पर्यटकांवर केली कारवाई

खालापूर पोलिसांनी पावसाळी पर्यटकांवर केली कारवाई

खालापूर – समाधान दिसले

कोरोना संकट पाहता खालापूर तालुक्यात पावसाळी पर्यटनाला बंद घातल्याने अनेक पर्यटकांची हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत असले तरी काही पर्यटक सर्व शासकीय नियमांना पायदळी तुडवून पावसाळी धबधबा व धरणांवर मौजमजा करीत असताना खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक स्वप्निल सावंतदेसाई व त्याच्या टिमने कलोते धबधब्यावर आलेल्या पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने या कारवाईत 14 कार व 12 बाईकस्वारांवर कारवाई करीत दंड आकारल्याने अनेक पर्यटकांचे धाबे दणाणले असून खालापूर पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहेत.

खालापूर तालुक्यातील पावसाळी पर्यटन अनेकांना भुरळ पाडत असून सह्याद्रीच्या डोंगर रांगेतून पांढरे शुभ्र पडणारी पाण्याची धार सर्वाना आकर्षित करित असल्याने खालापूर तालुक्यात वर्षा सहलीसाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते, परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे संकट असल्याने खालापूर तालुक्यात पर्यटनाला शासनाने बंदी घातली असून पर्यटनाच्या ठिकाणी खालापूर पोलिस आपली कामगिरी चोख बजावताना पाहायला मिळत असताना काही पर्यटक शासनाच्या नियमांना पायदळी तुडवून वर्षा सहलीचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करीत असताना 20 जून रोजी खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक स्वप्निल सावंतदेसाई व त्याच्या टिमने कलोते धबधब्यावर आलेल्या पर्यटकांवर कारवाई केल्याने अनेक पर्यटकांनी हिरमोड असून या कारवाईत 14 कार व 12 बाईकस्वारांवर कारवाई करीत दंड आकारले आहे.

याप्रसंगी पोलिस उपनिरिक्षक स्वप्निल सावंतदेसाई, पोलिस जे.एस.वाघ, विठ्ठल घावस, गोकुळआण्णा हेमाडे, प्रतिक्षा म्हात्रे, राजश्री दवणे, होमगार्ड लक्ष्मण झोरे आदी उपस्थित होते.

चौकट –
कोरोना वाढते संकट पाहता खालापूर पावसाळी पर्यटनावर बंदी घातली असतानाही अनेक पर्यटक कलोते धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी आले असता त्याच्या कारवाई करून दंड आकरण्यात आला आहे, तर पुढील काळात याठिकाणी कोणीही पावसाळी पर्यटनासाठी येऊ नये, जेणेकरून कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही.
स्वप्निल सावंतदेसाई (पोलिस उपनिरिक्षक)

चौकट –
कलोते ग्रामपंचायत हद्दीत धबधबा व धरण असतानाही ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यटनासाठी बंदी असल्याचे कोणतेही फलक अथवा जाहिरात न लावल्याने पर्यटकांना याठिकाणी बंदी असल्याचे समजू शकत नाही. त्यामुळे असंख्य पर्यटकांनी ग्रामपंचायती कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close