ताज्या घडामोडी

अटल विश्वकर्मा सन्मान योजना

अटल विश्वकर्मा सन्मान योजना अंतर्गत बांधकाम कामगार नोंदणी दिंडोरी पॅटर्न वतीने नाशिक जिल्हा तील ४५० असंघटित बांधकाम कामगार यांची महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. त्याचा पाठपुरावा करून त्यांना Smart Card मिळवुन दिले. सदर बांधकाम कामगार यांना covid-१९ अनुदान लाभ १५००/-रु मिळवुन दिला आहे. दिंडोरी पॅटर्न संचालक राजेंद्र भालेराव नाशिक यांनी याकामी पुढाकार घेऊन लाभ मिळवुन दिला…. दिंडोरी पॅटर्न चे दिलीप पेंढारी नाशिक व दत्तात्रय खैरनार नाशिक यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे.
अटल विश्वकर्मा सन्मान योजना अंतर्गत बांधकाम कामगार नोंदीत कामगार यांना भविष्यात २८ प्रकारचे लाभ योजना मिळतात. बांधकाम कामगारास स्वत:साठी लागणारे साहीत्य घरेदीसाठी — ५,०००/- तीन वर्षातून एकदा. बांधकाम कामगाराच्या स्वत:च्या पहिल्या विवाहाच्या खर्चास – ५०,०००/- ,बांधकाम कामगाराच्या पत्नीस दोन आपत्या पर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी किंवा शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी- २०,०००/-, एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी — १,००,०००/- मुदत बंद ठेव, बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रती वर्षी:- १) १ ली ते ७ वी — २,५००/- प्रतीवर्षी, २) ८ वी ते १० वी — ५,०००/-प्रतीवर्षी, ३) ११ वी १२ वी — १०,०००/- प्रतीवर्षी, ४) पदविका अभ्यासक्रम साठी – २०,०००/-, ५) पदवी साठी – २०,०००/- , ६) अभियांत्रिकी पदवीसाठी – ६०,०००/-, ७) वैद्यकीय पदवीसाठी – १,००,०००, ८) MS-CIT चे शिक्षण घेण्यासाठी- शुल्काची परीपूर्ती व इतर बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी – १,००,०००/- अर्थसाहाय्य बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारासाठी — ६,०००/- अर्थसाहाय्य बांधकाम कामगारास अपगत्व आल्यास – २,००,०००/- अर्थसाहाय्य बांधकाम कामगार मूत्यु झाल्यास अंतविधीसाठी — १०,०००/- अर्थसाहाय्य बांधकाम कामगाराचा मूत्यु झाल्यास त्याच्या वारसदारास प्रति वर्ष असे सलग 5 वर्षे -२४,०००/- अर्थसाहाय्य बांधकाम कामगाराचा कामावर मूत्यु झाल्यास – ५,००,०००/- अर्थसाहाय्य घर बांधणीसाठी- 4,50000/- (केंद्र शासन- 2,00000/-, कल्याणकारी मंडळ- 2,50000/-) अर्थसाहाय्य नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना लागू करणे . बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्यानंतर आपण वरील योजनांचा लाभ घेऊ शकता. नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक :- १) पासपोर्ट आकारातील फोटो २)महानगर पालिका-शहर अभियंता ग्रामपंचायत-ग्रामसेवक यांचा किंवा ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर यांचा ९० दिवस काम केल्याच्या दाखला ३) आधार कार्ड फोटो ४) रेशन कार्ड फोटो ५) बँक पासबुक फोटो६) पॅन कार्ड फोटो ७) स्वयं घोषणापत्र ८) आधार कार्ड वापराची परवानगी ९) घरातील सर्व सदस्य यांचे आधार कार्ड फोटो. सदर योजने अंतर्गत मागीलवर्षी २०२० मध्ये बांधकाम कामगार यांना ५०००/- रु (३००० रु + २००० रु) कोविड अनुदान दिले होते. तसेच चालू वर्षी २०२१ मध्ये १० लाख ८०० बांधकाम कामगार यांना १५००/- रु अनुदान देण्यात आले आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व आर्थिक दुर्बल असंघटीत कामगार यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दिंडोरी पॅटर्न संचालक राजेंद्र भालेराव, दिलीप पेंढारी, दत्तात्रय खैरनार यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close