ताज्या घडामोडी

येवला येथे विंचूर चौफुली येथे ओ बी सी आरक्षण बचाव रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते

येवला येथे विंचूर चौफुली येथे ओ बी सी आरक्षण बचाव रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते

अँकर :- ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ते पुन्हा मिळविण्यासाठी येवल्यात विंचूर चौफुली येथे समता परिषदेच्या वतीने पुणे – इंदोर व नाशिक – औरंगाबाद महामार्गवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी असलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले आहे. याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारकडे ओबीसी जनगणनेचा डाटा मागितलेला होता .तो सुप्रीम कोर्टात सादर न केल्यामुळे ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण रद्द झालेले आहे .ओबीसी आरक्षण पुन्हा पूर्ववत व्हावे तसेच या कामी केंद्र व राज्य सरकारने ओबीसी जनगणनेचा डाटा सर्वोच्च न्यायालयाला त्वरित सादर करून ओबीसी आरक्षण वाचवावे व नियमित करावे अशा मागणी करिता येवल्यातील विंचूर चौफुली येथे समता परीषदेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. भुजबळ साहेब चे पीए लोखंडे साहेब समाजसेवक विकी भैया सचिन सोनवणे अमजद निंबाळ निसार भाई शेख अलीम पठाण अनेक राष्ट्रवादीचे नगरसेवक शहर व तालुक्‍यातील अनेक कार्यकर्ता व नगरसेवक ग्रामसेवक उपस्थित होते. स्टार 2 महाराष्ट्र साठी शाकीर शेख येवला

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close