ताज्या घडामोडी

शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त कचेरी टेकडीवर वृक्षारोपण

शिवसेनेच्या स्थापना दिनानिमित्त कचेरी टेकडीवर वृक्षारोपण∞

नेरळ : दिपक बोराडे

शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त कर्जत शहर शिवसेनेच्या वतीने कर्जत तहसिल कार्यालयाच्या टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी,या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजक शहरप्रमुख भालचंद्र जोशी, माजी शहरप्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक मोहन ओसवाल,नगरसेविका प्राची डेरवणकर,शहर संपर्क संघटिका सायली शहासने,युवासेनेचे दर्शन वायकर ,फरहान चौगुले,अभिजीत मुधोळकर ,सुरेश भरकले,नाना कण्रूक,महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मीना कुलकर्णी, सामिया चौगुले, निसर्गप्रेमी विष्णू भोईर,वैभव सुरावकर,रितेश वायकर,शकील शेख, केतन जोशी इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुवर्णा जोशी यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साध्या पध्दतीने शिवसेनेचा स्थापना दिवस साजरा करण्याचे आवाहन केले आहे.तर युवासेनाप्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून माझी वसुंधरा ही मोहीम यशस्वी झाली आहे.त्यामुळे आम्ही वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन कार्यक्रम हाती घेतला आहे.ही सर्व झाडे जगविण्याचा संकल्प कर्जत शिवसेनेने घेतला आहे अशी माहिती जोशी यांनी दिली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close