ताज्या घडामोडी

व्यापऱ्यांनी शेतकऱ्यांचे थकविलेले पैसे मनमाड बाजार समितीने केले वाटप !*

*व्यापऱ्यांनी शेतकऱ्यांचे थकविलेले पैसे मनमाड बाजार समितीने केले वाटप !*

प्रतिनिधी.आफरोज अत्तार

कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड या बा जार समितीमध्ये सन 2017-18 मध्ये काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कांदा हा शेतमाल खरेदी केले व शेतकऱ्यांना न वटणारे चेक दिले, त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतमालाचे पैसे सबंधीत व्यापाऱ्याकडेस थकीत राहीले. त्यानंतर बाजार समितीने सबंधीत व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल केले व त्या व्यापाऱ्यांचे मालमत्तेच्या लिलावातुन शेतकऱ्यांची थकीत असलेली रक्कम वसुल होणेकामी तात्काळ कार्यवाही सुरु केली. परंतु काही तांत्रीक अडचणींमुळे सदर कार्यवाहीस विलंब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखिल त्यांचे हक्काची रक्कम मिळणेस विलंब होत होता. परंतु मनमाड बाजार समितीचे सत्ताधारी संचालक मंडळाने त्यांची नैतिक जबाबदारी म्हणुन याआधी रु. 13,00,000/- इतकी रक्कम संचालक अनामत रक्कम म्हणुन जमा केली होती ती शेतकरी वर्गास वाटप करुन शेतकरी वर्गास तात्पुरता दिलासा दिला होता. तसेच एका व्यापाऱ्यांकडुन त्यांची सर्व रक्कम वसुल करुन ती देखिल बाजार समितीने शेतकरी वर्गास वाटप केलेली आहे. परंतु तरी देखिल काही शेतकऱ्यांची रक्कम व्यापाऱ्यांकडेस थकीत राहीलेली आहे. मागिल वर्षापासुन कोरोना या रोगामुळे शेती उद्योगाला फार मोठा फटका बसलेला असल्याने शेतकरी अडचणीत सापडलेले आहे. त्यामुळे सन 2017-18 या वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेतमालाची रक्कम बाजार समितीमधील व्यापाऱ्यांकडे थकीत झालेले होते, अश्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडे असलेली रक्कम ही व्यापाऱ्यांकडुन अजुनही परत मिळाली नसल्याने तसेच ती रक्कम मिळणेस उशिर होणार असल्याने, त्या सर्व शेतकऱ्यांची आजरोजी थकीत असलेली संपुर्ण रक्कम वाटप करणेसाठी नांदगांव तालुक्याचे आमदार मा.श्री. सुहास (आण्णा) कांदे यांचे समन्वयाने मनमाड बाजार समितीचे सत्ताधारी संचालक मंडळाने पुन्हा संचालक अनामत रक्कम जमा केलेली आहे व त्यातुन शेतकऱ्यांची थकीत असलेली रक्कम वाटप करण्याचे काम बाजार समितीने सुरु केलेले आहे. नांदगांव तालुक्याचे आमदार मा.श्री.सुहास (आण्णा) कांदे हे बाहेरगांवी असल्याने यांचे प्रतिनीधी म्हणुन उपस्थित असलेले श्री. किरणभाऊ देवरे यांचे हस्ते प्राथमिक स्वरुपात शेतकरी वर्गास त्यांची थकीत असलेली रक्कम वाटप करणेस मनमाड बाजार समितीमध्ये सुरुवात करणेत आली. यावेळी बऱ्याच वर्षापासुन व्यापाऱ्यांकडे थकीत असलेली रक्कम एैन पेरणीच्या वेळी मिळाल्याने तसेच सदरचे पैसे हे बाजार समितीचे संचालकांनी त्यांचे स्वत:चे निधीतुन दिल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले. तसेच सन 2017-18 मध्ये बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री करणाऱ्या ज्या शेतकऱ्यांचे पैसे व्यापाऱ्यांकडे थकीत आहे, अश्या शेतकऱ्यांनी बाजार समितीशी संपर्क साधुन आपले पैसे घेऊन जावे असे आवाहन बाजार समितीचे वतीने यावेळी करणेत आले. तसेच यावेळी शेतकरी बांधव, बाजार समितीचे सभापती डॉ. मच्छिंद्र हाके, उपसभापती राजु सांगळे, संचालक डॉ. संजय सांगळे, गंगाधर बिडगर, किशोर लहाने, भागीनाथ यमगर, दशरथ लहिरे, सौ. सुभद्राबाई उगले, सौ. मिराबाई गंधाक्षे, भाऊसाहेब जाधव, उत्तम व्हर्गळ, आप्पा कुणगर, अशोक पवार, आनंदा मार्कंड, बाजार समितीचे सचिव श्री. रमेश कराड व इ. हे उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close