ताज्या घडामोडी

माझे कुटुंब माझी जबाबदारी याचे भान ठेवा-तहसीलदार श्री पाटील साहेबांचे आवाहन

माझे कुटुंब माझी जबाबदारी याचे भान ठेवा-तहसीलदार श्री पाटील साहेबांचे आवाहन

नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी-उदय वायकोळे

रुग्ण संख्या कमी होत असल्याचे लक्षात आल्यावर शासनाने काही नियम शिथिल केले तथापि नियमांचं पालन करणं बंधनकारक असल्याचे देखील शासनाने सुचित केले होते परंतु असं लक्षात येत आहे की, कोविडच्या दुसरा लाटेतून आपण कोणताही धडा घेतलेला दिसून येत नाही नागरिक कोविड नियमांचे पालन न करता बेफिकीरपणे गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन न करता व बरेचसे नागरिक विना मास्क फिरत आहे त्यामुळे रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे राज्याच्या कोविड टास्क फोर्सने तिसरी लाट 4 आठवड्यात येण्याची शक्यता वर्तविली आहे
तरी *सर्व नागरिकांना आवाहन* करण्यात येते की त्यांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे
अनावश्यक गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये
बाहेर जाताना मास्क परिधान करावा व
सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे लहान मुलं व जेष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये
काळजी घ्या सुरक्षित राहा
माझे कुटुंब माझी जबाबदारी याचे भान ठेवा असे चांदवडचे तहसीलदार श्री प्रदीप पाटील साहेब यांनी सोशल मिडियाद्वारे कळविले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close