ताज्या घडामोडी

क्रीडा संकुलाचे बांधकाम मुळ आराखड्या नुसार सुरू करावे* *:पालकमंत्री छगन भुजबळ*

क्रीडा संकुलाचे बांधकाम मुळ आराखड्या नुसार सुरू करावे*

*:पालकमंत्री छगन भुजबळ*

*नाशिक; दि.19 जून,2021*

जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी शासनाकडून 25 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून, या संकुलाच्या बांधकामा साठी लागणाऱ्या आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. तरी लवकरात लवकर मुळ आराखड्यानुसार क्रीडा संकुलाचे बांधकाम सुरू करावे, असे निर्देश राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक घेण्यात आली त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता शरद राजभोज, कार्यकारी अभियंता सिध्दार्थ तांबे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, उपशिक्षण अधिकारी एस.एन.झोले, महानगरपालिका उपअभियंता एस.जे.काझी, आंतरराष्ट्रीय धावपट्टू कविता राऊत, शिवछत्रपती पुरस्कार्थी हितेंद्र महाजन, बोरख बलकवडे, राजेंद्र निबांळते, आदी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महानगरपालिकेमार्फत जिल्हा क्रिडा संकुलासोबत तेथे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सांगितलेल्या पार्किंगच्या प्रस्तावाबाबातही विचार करण्यात आला, परंतु स्मार्ट सिटीच्या पार्किंग सहित विकसन करण्याबाबतच्या प्रस्तावासाठी स्मार्ट सिटी, जिल्हा परिषद अथवा महापालिका यांचेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे पूर्ववत मूळ प्रस्तावित आराखड्यानुसार सर्व सोईंनीयुक्त क्रीडा संकुलाचे बांधकाम सुरु करावे. तसेच सर्व विभागांशी समन्वय साधुन क्रीडा विषयक सुविधांना प्राधान्य देण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

सदर क्रीडा संकुला अंतर्गत प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रेक्षक गॅलरी, सिथेटीक धाव मार्ग, फुटबॉल मैदान, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, टेनिस, बास्केटबॉल, इत्यादी मैदाने, इनडोअर गेम हॉलमध्ये बॅटमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, ज्युदो, तलवारबाजी, बॉक्सिंग, कॅरम, बुध्दिबळ, योगा, व्यायमशाळा, या व्यतिरीक्त कॅफेटेरीया, पार्कींग अशा एकूण २४ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र नाईक यांनी यावेळी दिली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close