ताज्या घडामोडी

खरसिंग फाटा येथे तातडी उड्डाणपुल न झाल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार –:अशोकराव माने,नंदकुमार पाटील यांचा इशारा,

खरसिंग फाटा येथे तातडी उड्डाणपुल न झाल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार –:अशोकराव माने,नंदकुमार पाटील यांचा इशारा,

खरसिंग फाटा येथून राज्यमार्गवर जाण्यासाठी थुयारी किंवा उड्डाणपुलांची व्यवस्था नसल्यामुळे विनाकारण यामार्गवरून येजा करणार्या वीस ते पंचवीस गावच्या लोकांना सर्व्हीससाठी,शिक्षणासाठी ,शेतमाल विक्रीसाठी सांगली मिरज ही बाजाराचे मोठे ठिकाण असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अलकुड (एम)या गावाजवळील पुलाखालून येजा करावी लागत आहे ,खरसिंग फाटा येथे महामार्ग करणार्या कंपनीने भुयारी किंवा उड्डाणपुल करून देतो आहे,असे आश्वासन खरसिंगसह यामार्गावरून येजा करणार्या लोकांना संबधित कंपनीने तसे आश्वासन दिले होते,पण प्रत्यक्षात मात्र असा कोणताही रस्ता केला नाही उलट येजा करण्यासाठी अलकुड एम यागावाच्या पुलाखलून जाण्यायेण्याचा मार्ग करून या रस्त्यावरून येजा करणार्या नागरिकांना विनाकारण चार ते पाच किलोमीटर जादा जाण्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे,शेतकरी संघटनेच्या व यामार्गावरून जाणार्या नागरिकांना महामार्ग समिती तहसीलदार कवठेमहाकांळ यांना वारंवार निवेदने दिली होती पण भुयारी मार्ग किंवा उड्डाण पुल केला नाही,म्हणून संबधित रस्तावरून जाणारे नागरिक व गैरसोय होणार्यि गावच्या लोकांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचे सर्व गावचे नागरिक व शेतकरी संघटना सांगली जिल्हा यांच्याकढून आज खरसिंग येथे झालेल्या बैठकीत ठरले असल्याचे शेतकरी संघटनेचे नेते अशोकराव माने व तालुकाध्यक्ष नंदकुमार यांनी दिली आहे,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close