ताज्या घडामोडी

रायगड,रेवदंडा खवळलेल्या समुद्रात बुडत्या जहाजावरून तटरक्षक दलाने वाचवले 16 जणांचे प्राण.

नवी मुंबई :उपसंपादक अफजल देवळेकर सरकार.

रायगड,रेवदंडा खवळलेल्या समुद्रात बुडत्या जहाजावरून तटरक्षक दलाने वाचवले 16 जणांचे प्राण.
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा जवळील खवळलेल्या समुद्रात बुडत असलेल्या जहाजातील 16 खलाशांना वाचविण्याची थरारक कामगिरी तटरक्षक दलाने गुरूवारी सकाळी केली. तटरक्षक दलाची गस्तीनौका सुभद्राकुमारीचौहान वरील सैनिक तसेच दमणच्या तळावरून आलेले हेलिकॉप्टरवरील सैनिक यांनी धाडसाने ही मोहीम यशस्वी केली. विशेष म्हणजे एमव्ही मंगलम या बुडत्या जहाजावरील कप्तान व कर्मचारी जहाज सोडण्याच्या बेतात होते. मात्र खवळलेल्या समुद्रात त्यांच्या जिवाला धोका उद्भवण्याची शक्यता असल्याने तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना धीर देत जहाजावरच राहण्यास सांगितले व त्यांची यशस्वी सुटका केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close