क्राईम

*ममदापुर राखीव वनहद्दीतील लेंडीखताची परस्पर विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व करावाईची मराठा मावळा संघटनेची मागणी!!!!*

*ममदापुर राखीव वनहद्दीतील लेंडीखताची परस्पर विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व करावाईची मराठा मावळा संघटनेची मागणी!!!!*

येवला तालुक्यातील ममदापुर राखीव वनहद्दीतील लेंडीखत हे वनविभागाचे वनपाल यांनी अनाधिकृत रित्या विक्री केले आहे.त्यामुळे मराठा मावळा संघटनेच्या वतीने नाशिक पूर्व वनविभाग प्रमुख तुषार चव्हाण पाटील,व नागपूर मुख्य वनविभागाला निवेदन देण्यात आले.यावेळी उपस्थित मराठा मावळा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रदीप दवंगे, नाशिक जिल्हा अध्यक्ष देविदास गुडघे पाटील, नाशिक जिल्हा शहर अध्यक्ष स्वप्नील चव्हाण, नाशिक शहर कार्यअध्यक्ष राकेश वाडिले, महेश डोखे, प्रकाश आव्हाड सह मराठा मावळा संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील राखीव वनक्षेत्र येथील वन विभागाच्या हद्दीत असलेले लेंडीखत हे वनविभागाचे वनपाल यांनी अनाधिकृत रित्या विक्री केले आहे.सदर बाबत काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतिकडे तक्रार दाखल करून सदर घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या माहिती नुसार आपल्या वनविभागाचे संबंधित वनपाल यांनी ग्रामपंचायतीस कोणतीही माहिती न देता शासकीय जागेवरील मालमत्तेचा निलाव न करता विकून टाकण्यात आल्याचे समजले आहे.सदर बाबत 28 मे रोजीच्या सभेत चर्चा देखील झाली आहे. परंतु प्रस्तुत प्रकरणी अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नसून आपल्या वीभागाकडून संबंधित वनपाल, वनरक्षक यांना वाचवीनेचे कमी सदर प्रकरण दाबले जात असल्याची शंका मराठा मावळा संघटनेला येत आहे.त्यामुळे प्रस्तुत प्रकरणी आपण स्वतःआपले स्तरावरून संबंधित सहाय्यक वनरक्षक अधिकारी नेवसे, वनपाल मोहन पवार, वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ, यांची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्यात यावे. या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांवर आत्ता पर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसल्याने हे प्रकरण काही संबंधित स्थानिक अधिकारी गावकऱ्यांवर दबाव टाकून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे मराठा मावळा संघटनेच्या ही बाब लक्षात आल्याने या प्रकरणी संबंधित अधिकारी यांचेवर निलंबनाचीकार्यवाही न झाल्यास मराठा मावळा संघटनेचे नाशिक जिल्हा स्तरीय पदाधिकारी वन विभागाच्या हद्दीत दि.28 जून रोजी उपोषणास बसणार असून त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या वनविभागाचे राहिल अशा इशारा मराठा मावळा संघटनेच्या वतीने देण्यात आली.

कोट:-
शासकीय मानधन मिळत असतानाही.वनहद्धीतील मालमत्तेची परस्पर विक्री करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कुणाचा आशीर्वाद.
देविदास गुडघे पाटील
मराठा मावळा संघटना नासिक जिल्हा अध्यक्ष,
संस्थापक अध्यक्ष छत्रपती फाउंडेशन येवला -नासिक

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close