ताज्या घडामोडी

देवपुरातील रस्त्यांची झालेल्या चाळण वरून आमदार शाह संतापले..! जयहिंद जलतरण ते जयहिंद वरिष्ठ महाविद्यालय पावेतोचा रस्ता व गटार करण्यासाठी ८ दिवसांची दिली मुदत..!*

प्रतिनिधि मोहसिन शाह

प्रतिनिधि मोहसिन शाह

*देवपुरातील रस्त्यांची झालेल्या चाळण वरून आमदार शाह संतापले..! जयहिंद जलतरण ते जयहिंद वरिष्ठ महाविद्यालय पावेतोचा रस्ता व गटार करण्यासाठी ८ दिवसांची दिली मुदत..!*

*भुयारी गटार प्रकरणात ठेकेदारासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करत काळ्या यादीत टाका – आमदार फारूक शाह*

*आमदारांकडून महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यां समवेत विविध कामांची चर्चा व पाहणी..!*

(धुळे दि. १७-०६-२०२१) धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्याकडे गेल्या महिन्याभरापासून काही सामाजिक संघटना, ज्येष्ठ पत्रकारांनी आणि शहरातील नागरिकांनी आमदार शाह यांना विविध समस्यांचे निवेदने दिली होती. या निवेदनांची दखल घेत धुळे शहरातील समस्या सोडवण्यासाठी आमदार फारूक शाह यांनी आज धुळे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच वीज वितरण कंपनी सारख्या सर्व प्रशाकीय वरिष्ठ अधिकाऱ्यां समवेत बैठक घेत धुळेकर नागरिकांनी केलेल्या समस्यांचा पाढा वाचला. झालेल्या बैठकीत आमदार फारूक शाह यांनी विविध कामांची चर्चा करत व देवपुरातील रस्त्यांची झालेल्या दुर्दशेंची पाहणी करत लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. झालेल्या बैठकीत शहरात विविध ठिकाणी घरकुल बांधणे कामी उपाययोजना करणे, सन २००० पूर्वीचे अतिक्रमित घरांना नियमित करून ७/१२ उतारा देणे, भुयारी गटारींमुळे रस्त्याची झालेली दुर्दशा याबाबत तात्काळ उपाययोजना, शहरातील नाले सफाई करणे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे, वीज वितरण कंपनीच्या वाढत्या तक्रारींवर तात्काळ नागरीकांच्या समस्या सोडविणे, जास्तीचे वीज बिल न आकारणे यासारख्या अनेक मुलभूत समस्या आणि बाबींवर बैठक संपन्न झाली. वरील काम करण्यासंदर्भात दिरंगाई न करता लवकरात लवकर सांगितलेली सर्व कामे पूर्ण करावीत असे सर्वच अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले.

या बैठकी आणि पाहणी दौऱ्याप्रसंगी धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्या समवेत धुळे मनपाचे सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, शहर अभियंता कैलास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. वर्षा घुगरी, उप अभियंता एजाज शाह, वीज वितरण कंपनीचे प्रभारी कार्यकारी अभियंता एन. बी. गांगुर्डे उपकार्यकारी अभियंता रवींद्र पवार, दुर्गेश साळुंखे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप विभागीय अभियंता दीपक कुलकर्णी, शाखा अभियंता डी.डी. पाटील, सहाय्यक अभियंता एस. एस. धोतरे, परवेज शाह, हाजी शाकीब शाह, निलेश काटे, आसिफ पोपट शाह, सऊद आलम, शाहीद टिपू सर, अफसर शाह आदींसह ईतर अधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते….

शाह फारूक अन्वर
आमदार, धुळे शहर

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close