ताज्या घडामोडी

उमरोली टेकडीवर भास्कर लोंगले यांच्या माध्यमातून वृक्षारोपण

उमरोली टेकडीवर भास्कर लोंगले यांच्या माध्यमातून वृक्षारोपण

नेरळ: दिपक बोराडे

कर्जत-नेरळ राज्यमार्ग रस्त्यावरील उमरोली ग्रामपंचायतीचे सदस्य भास्कर लोंगले यांनी पुढाकार घेऊन एक हजार झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे.उमरोली टेकडीवर हि झाडे लावली जाणार असून झाडे लावण्याचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
भास्कर लोंगले हे दरवर्षी विविध उत्सवाच्या निमित्ताने वृक्ष लागवड करत असतात. तर यावेळी कोरोनाचा उद्रेक त्यात कृत्रिम प्राणवायूची कमतरता यामुळे त्यांनी एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.केवळ वृक्ष लागवड नाही तर त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार लोंगले यांनी केला आहे.
वृक्षारोपण लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सागर शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष रंजना धुळे यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी उमरोली ग्रामपंचायत सदस्य प्रचिती गायकर, उकृल ग्रामपंचायत सरपंच वंदना थोरवे,चिंचवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच ऋषिकेश भगत,उमरोली येथील नवतरुण मित्रा मंडळ उमरोली अध्यक्ष विनोद लोंगले,संतोष थोरवे, तेजस तुपे,पंकज बुंधाटे,सचिन गायकर,जितेंद्र रुठे,दिलीप लोंगले, अभिजित लोंगले, रोहन लोंगले, डॅनी लोंगले,राजेंद्र लोंगले,संदीप मोरे, माजी सरपंच महादेव लोंगले,विजय लोंगले,परशुराम लोंगले,रामदास तुपे, नरेश लोंगले आदी उपस्थित होते

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close