ताज्या घडामोडी

कळंब परिसरातील शेतकऱ्यांना कृषीविभागाकडून बियाण्यांचे वाटप

कळंब परिसरातील शेतकऱ्यांना कृषीविभागाकडून बियाण्यांचे वाटप

नेरळ :- दिपक बोराडे

कर्जत तालुका कृषी विभागाकडून कळंब व परिसरातील गावातील शेतकऱ्यांना त्याच्या शेताच्या बांधावर जाऊन तूर, व नाचणीच्या बियाणे तसेच जैविकखताचे वाटप केले.
तालुका कृषी विभाग शेतकऱ्यांनसाठी विविध योजना राबवत आहेत यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना भातशेती बरोबरच शेताच्या बांधावर तुरीची लागवड करून तुरीचे पीक घेऊन आपले उत्पन्न वाढवण्यासाठी गुरुवार दिनांक 17 जून ला कृषिअधिकारी,कर्मचार्यांनी कळंब परिसरातील वारे ,तात्यांचीवाडी ,बोरीचीवाडी ,सुतार पाडा, मानकीवली, कुरुंग ,जांभुलवाडी, या गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना तुरीच्या पिक लागवडी विषयी मार्गदर्शन केले, व त्यांना तुरीचे तसेच नाचणीच्या बियाणांच वाटप केले,यांसह अज्योतो बायर या जैविकखताचे ही यावेळी वाटप करण्यात आले ,यावेळी कृषी पर्यवेक्षक सचिन केणे, मंडळ कृषी अधिकारी प्रवीण जाधव ,कृषी सहाय्यक, किरण गंगावणे ,माजी सभापती धर्मा निरगुडा,कृषी मित्र रवींद्र चौरे , हरीचंद्र सराई, वारे ग्रामपंचायत सदस्य भास्कर काबडी,लक्ष्मण राणे, सुनील बदे,पांडुरंग बदे,शेतकरी उपस्थित होते,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close