ताज्या घडामोडी

मालेगांव तालुक्यातील तळवाडे गावातील ग्रामपंचायत कार्यालयाला गावातील ग्रामस्थांच्या वतीने लावण्यात आले टाळे*

*मालेगांव तालुक्यातील तळवाडे गावातील ग्रामपंचायत कार्यालयाला गावातील ग्रामस्थांच्या वतीने लावण्यात आले टाळे*

पोलीस टाईम्स न्युज मालेगांव तालुका प्रतिनिधी:-मनोहर पानसरे
सविस्तर दिनांक:-१७/६/२०२१ रोजी तळवाडे गावात ग्रामपंचायत कार्यालयातिल सरपंच उपसरपंच बॉडी वरती असणारे सदस्य ग्रामसेवक कोर भाऊसाहेब यांच्या माध्यमातून गावातील समस्या ज्या असतील त्या पूर्ण केल्या जातात,तळवाडे गावाला धरणाजवळील विहीर च्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जातो,गावातील विहीर जिच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जातो परंतु तिच्याकडे मागील बऱ्याच वर्षांपासून लक्ष दिले जात नसून,तिचे पाणी पिण्या योग्य नाही,अशी तेथील परिस्थिती आहे,परंतु या ठिकाणची परिस्थिती अतिशय वाईटअसून देखील गावात तब्बल 1 महिन्यापासून पाणीपुरवठा केला जात नसून,जे सदस्य निवडून आले परंतु ते सत्तेत नसून आपल्या आपल्या वार्डात जनतेची सेवा करण्यासाठी स्वतःखर्च करून ट्रॅक्टर टँकर च्या सहाय्याने पाणी घरपोच उपलब्ध करूनदेत असून,देखील ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक व सत्तेत असणारे सदस्य मात्र पाणी टंचाई व लाईट या सारख्या समस्या सोडवण्यात अपयशी पडले आहेत,म्हणून गावातील ग्रामस्थ हे आज एकजुटीने येऊन ग्रामपंचायत कार्यालयात त्यांच्या मागण्या ज्या आहेत,त्या लेखी स्वरूपात देऊन सरपंच व तेथील वसुली कारकून यांच्या कडे आवेदन देतांना,निवडून आलेले सदस्य अनिल (दादा) शिरोळे,बंडू कुवर,अमोल जगताप,व निवृत्ती सोनवणे,वाघ डॉक्टर,महेंद्र शिरोळे,निंबा जाधव,अनिल पवार,सुभाष पानसरे,दीपक शिरोळे…. आदी इतर ग्रामस्थ उपस्तीत होते,आवेदनात पाण्याची समस्या,लाइट,इतर हिशोब व तेथील ग्रामसेवक यांची तातडीने बदली करण्यात यावी ह्या समस्या सांगण्यात आल्या आहेत..त्या संदर्भात तहसीलदार रजपूत साहेब,व गटविकास अधिकारी,जि, प,सदस्य समाधान हिरे.प,स,सदस्य बापू पवार यांना माहिती देण्यात आली आहे,
व गावातील सर्व ग्रामस्थ तरुण यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप (टाळे)लावून निषेध व्यक्त केला..

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close