ताज्या घडामोडी

पत्रकारांच्या मागण्या मान्य न झाल्यास 15 ऑगष्ट पासून राज्यभर आंदोलन -: संतोष निकम*

*पत्रकारांच्या मागण्या मान्य न झाल्यास 15 ऑगष्ट पासून राज्यभर आंदोलन -: संतोष निकम*
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-:महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रश्नां संदर्भात केंद्र सरकार व राज्य शासनाकडे पत्रकार संघाच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले आहे, पत्रकारांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या १५ ऑगस्ट पासून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी दिला आहे. संतोष निकम हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्या प्रसंगी नाशिक जिल्ह्यातील विंचुर निफाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भारत सरकार मान्यताप्राप्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघात विंचूर येथे निफाड तालुक्यातील अनेक पत्रकारांनी जाहीर प्रवेश केला. पत्रकार सुनील शिरसागर मच्छिंद्र साळुंखे अनिल भावसार महेश साळुंखे अभय पाटील नंदू बागल युनूस पठाण रोहन सरोदे दत्तात्रेय दरेकर आदींसह निफाड तालुक्यातील अनेक पत्रकारांनी आपल्या समस्या राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडे मांडल्या त्या सोडविण्यासाठी बहुउद्देशीय पत्रकार संघ प्रयत्न करणार असल्याचे निकम यांनी सांगितले . या प्रसंगी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख संतोष अहिरे, प्रदेश संघटक विजय केदारे, महाराष्ट्र राज्य प्रदेश उपध्यक्ष ङाॅ राजेश साळुंके, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश वराडे, उतर महाराष्ट्र संघटक शातांरामभाऊ दुनबळे, नाशिक जिल्हा अध्यक्ष संतोष सोनवणे, समाजकार्य संघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरूण डांगळे, हयूमन राइटस् संघ जिल्हा उपाध्यक्ष देविदास इंगळे, जिल्हा प्रवक्ते राजेंद्र अहिरे, राष्ट्रीय विश्‍वगामी निफाड तालुका महिला संघ उपाध्यक्ष चंद्रकला केदारे, राष्ट्रीय विश्‍वगामी विद्यार्थी संघ नाशिक जिल्हा उपाध्यक्ष हिमेश पगारे आदी उपस्थित होते.
यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की राज्यात पत्रकारांच्या सेवेसाठी विश्‍वगामी पत्रकार संघ वर्षातील 365 दिवस व दिवसातील 24 तास कार्यरत आहे. पत्रकार व्यक्ती आपल्या संघात असो किंवा नसो परंतु अडचणीच्या वेळेस विश्वगामी पत्रकार संघ कायम त्यांच्या पाठीशी असेल असे मत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी यावेळी विचार व्यक्त केले. सोमनाथ मानकर यांची नाशिक जिल्हा उपसचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन सोमनाथ मानकर यांनी केले. यावेळी निफाड तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close