ताज्या घडामोडी

कर्जतच्या कशेळे भागात रानगव्याचे दर्शन….

कर्जतच्या कशेळे भागात रानगव्याचे दर्शन….

नेरळ : दिपक बोराडे
कर्जत तालुक्यातील कशेळे भागात 15 जूनच्या रात्री रानगव्याचे दर्शन झाले.काहीसा लाजाळू असलेला हा प्राणी सहसा दिवसा नजरेस पडत नसून रात्री जंगलात फिरताना दिसतो.
अभयारण्य किंवा मोठ्या जंगलांमध्ये आढळणारा किमान 1000 किलो वजनाचा रानगवा हा प्राणी 15 जूनच्या रात्री कर्जत तालुक्यातील कशेळे भागात अनेकांच्या नजरेस पडला. कशेळे- खांडस रस्त्यावर कशेळे गावाच्या बाहेर महावितरण कंपनीचे वीज उपकेंद्र आहे आणि त्या ठिकाणी तेथील सुरक्षा रक्षक यांच्या बरोबर कशेळे गावातील चंदू राणे हे तरुण गप्पा मारत बसले होते.त्या दोघांना वीज उपकेंद्राच्या पुढे असलेल्या स्मशानभूमी शेडच्या बाजूला काळ्या रंगाचा मोठा प्राणी दिसून आला. कशेळे गावाची गुरचरण असलेल्या त्या भागात मग दोघांनी आपली दुचाकी घेऊन त्या प्राण्याचे आपल्या मोबाईल मध्ये शूटिंग करण्यासाठी पाठलाग सुरू केला.सध्या पाऊस पडत असल्याने रात्री तेथे असलेला नाला ओलांडून तो प्राणी पलीकडे गेल्याने चंदू राणे आणि सुरक्षा रक्षक यांना पुढे जाता आले नाही,परंतु त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केलेला प्राणी हा रानगवा असल्याचे स्पष्ट झाल्याने प्राणीमित्र आणि प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

रानगवा ची विकिपीडियावर असलेली माहिती…….
जंगली म्हैस याच्याशी गल्लत करू नका,कारण रानगवा किंवा गौर हा एक शाकाहारी भूचर प्राणी आहे. हा प्राणी भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेश व आग्नेय आशियाई देशांत आढळतो. केवळ दिसण्यावरून याला इंग्रजीत इंडियन बायसन असे म्हणतात.असे असले तरी बायसन आणि रानगवा हे दोन वेगवेगळ्या कुळातील जीव आहेत. भारतीय पशूंच्या मनाने रानगवा ही एक सगळ्यात उंच जंगली गाय आहे.
शास्त्रीय वर्गीकरणजीवसृष्टी:प्राणी
वंश:कणाधारी
जात:सस्तन
वर्ग:युग्मखुरी
कुळ:गवयाद्य
उपकुळ:गोवंश
जातकुळी:बोस
जीव:गॉरस
शास्त्रीय नावबोस गॉरस
एच. स्मिथ- 1827

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close