ताज्या घडामोडी

का खंडित झाला लासलगाव शहरातील स्ट्रीट लाईट चा वीजपुरवठा

का खंडित झाला लासलगाव शहरातील स्ट्रीट लाईट चा वीजपुरवठा

लासलगाव/राहुल वैराळ

लासलगाव दि १५–राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नाशिक जिल्हा हॉटस्पॉट झाला होता परंतु रुग्ण संख्या झपाट्याने कमी झाल्याने जिल्हा हळुहळु अनलॉक करण्यात आला असून महावितरण कंपनीने घरगुती व्यवसायिक आणि ग्रामपंचायत व औद्योगिक,शेती यांचे विज बिलांची थकबाकी वाढल्याने महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वीज कनेक्शन तोडण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.याचा फटका लासलगाव येथील स्ट्रिट लाईटला ही बसला आहे.या मोहिमेत महावितरण कंपनीने आतापर्यंत 5 जल योजना,लासलगांव सह 23 स्ट्रिट लाईट कनेक्शन, घरगुती आणि औद्योगिक 30 कनेक्शन खंडीत केले आहे.

लासलगाव शहरातील स्ट्रीटलाइट चे विज बिल जिल्हा परिषदेने न भरल्याने वीज वितरण कंपनीचा लासलगाव कार्यालयाने स्ट्रिट कनेक्शन खंडीत केले आहे त्यामुळे लासलगाव हे काळोखात बुडाले आहे. महावितरण कंपनीने वीज बिल थकबाकीदार असलेल्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याची जोरदार मोहीम हाती घेतली आहे.घरगुती ग्राहकांबरोबर औद्योगिक आणि शासकीय ग्राहकांना याचा मोठा फटका बसत आहे.लॉक डाऊन मध्ये बंद असलेले उद्योग आणि व्यवसाय गेल्या दोन-अडीच महिन्यापासून बंद होते.त्यामुळे विजेची थकबाकी भरण्यासाठी किमान समान हप्ते तरी पाठवून द्यावे अशी रास्त मागणी वीज ग्राहकांनी केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close